विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी ते माझा अरविंद केजरीवाल करतील- रोहित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 19:47 IST2024-04-30T19:46:12+5:302024-04-30T19:47:55+5:30
लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारानिमित्त डोर्लेवाडी येथे आमदार रोहित पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते....

विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी ते माझा अरविंद केजरीवाल करतील- रोहित पवार
डोर्लेवाडी (पुणे) : लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारानिमित्त डोर्लेवाडी येथे आमदार रोहित पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रोहित पवार म्हणाले की, आमच्याही कंपन्या, कारखाने यांच्यावर कारवाया झाल्या. मी जर यांच्याकडे दबावाला बळी पडून सत्तेत गेलो असतो तर या कारवाया झाल्या नसत्या. मी जर त्यांच्याकडे गेलो असतो तर एवढ्या लहान वयात मलाही मंत्री पद मिळाले असते परंतु मी पवार साहेबांच्या सोबत राहिलो.
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, आता लोकसभा निवडणूक झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी ते माझा अरविंद केजरीवाल करतील. महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारानिमित्त घेतलेल्या सभेमध्ये ते बोलत होते.