बीईजीची फसवणूक
By admin | Published: November 17, 2016 03:30 AM2016-11-17T03:30:13+5:302016-11-17T03:30:13+5:30
बनावट कागदपत्रांच्या आधारे खडकी येथील बीईजी अँड सेंटर ग्रुपच्या मुख्यालयात प्रशिक्षणासाठी दाखल झालेल्या आणखी एका व्यक्तीला येरवडा पोलिसांनी अटक केली.
पुणे : बनावट कागदपत्रांच्या आधारे खडकी येथील बीईजी अँड सेंटर ग्रुपच्या मुख्यालयात प्रशिक्षणासाठी दाखल झालेल्या आणखी एका व्यक्तीला येरवडा पोलिसांनी अटक केली. त्याला १७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. के. नंदनवार यांनी दिला आहे.
पवनकुमार ममनराव (वय ४१, रा. येरवडा) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणात यापूर्वी ४ जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत खडकी येथील बीईजी अँड सेंटर रेजिमेंटलचे सुभेदार संतोष विनायक भोसले (वय ४४, रा. खडकी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ममनराव याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्या वेळी त्याचे आणखी कोण साथीदार आहेत का? तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी वकील सुहास धुमाळ यांनी केली. (प्रतिनिधी)