Kanhaiya Kumar: 'भीक मागून पुरस्कार मिळतात, स्वातंत्र्य नाही'; कन्हैया कुमारांचा कंगनाला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 09:06 PM2021-12-09T21:06:56+5:302021-12-09T21:12:51+5:30
सध्या ज्यांना देश वाचवायचा आहे त्यांनी काँग्रेसमध्ये या असं आवाहन काँग्रेस नेते कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) यांनी पुण्यात बोलताना केले...
पुणे: 'भीख से अवार्ड मिल सकता है आझादी नही’, असं म्हणत वादग्रस्त अभिनेत्री कंगना रणौतला टोला लगावला आहे. स्वातंत्र्यावरील वक्तव्यावरून कन्हैया कुमारांनी (kanayya kumar) कंगनाला फटकारले. काही दिवसांपूर्वी कंगनाने भारताला मिळालेले स्वतंत्र्य भीखेत मिळाले असल्याचे म्हणाल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. यालाच प्रत्यूत्तर देताना कन्हैया कुमारांनी भीक मागून पुरस्कार मिळतात स्वातंत्र्य नाही म्हणत कंगनाला (kangana ranaut) टोला लगावला. पुण्यात देशातील बदलती राजकीय व सामाजिक परिस्थिती यावर शहरात वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना कंगनाच्या वक्तव्यावर प्रश्न विचारण्यात आला होता.
काँग्रेसचे चरित्र या देशाचे चरित्र आहे. एकाच बागेत अनेक रंगाची फुले फुलवण्याचा विचार आहे हा. या देशात अतिवाद चालत नाही. सध्या ज्यांना देश वाचवायचा आहे त्यांनी काँग्रेसमध्ये या असं आवाहन काँग्रेस नेते कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) यांनी पुण्यात बोलताना केले. पुढे बोलताना ते म्हणाले, नेतृत्व तोच पक्ष करेल ज्याला देश समजेल. ज्यांनी रेल्वे नाही बनवली, ज्यांनी बीएसएनएल नाही बनवले ते एका सेकंदात या कंपन्या विकणारच. ज्यांनी बनवले तेच या कंपन्या वाचवणार. एक बडबोला माणूस अर्ध्या रात्री ऊठून बोलेल तर देश वाचणार नाही तर विकणारच. गांधींना मानणाऱ्यांनी काँग्रेसमध्ये या, त्यांची हत्या करणाऱ्यांना मानणाऱ्यांनी भाजपात जा, असं कन्हैया कुमार यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना कन्हैया कुमार म्हणाले, मोदींना पर्याय काय विचारता? ही लोकशाही आहे, इथे कोणावाचून काहीच राहत नाही. सध्या संसदेत एकाही विषयावर चर्चा होत नाही. पंतप्रधानांना विरोध केला तर देशद्रोही कसे काय होते? असा प्रश्नही कन्हैया कुमार यांनी यावेळी केला.