Pune: आपकडून नगररोड क्षेत्रीय कार्यालयाबाहेर भीक मांगो आंदोलन
By निलेश राऊत | Published: August 23, 2023 03:37 PM2023-08-23T15:37:05+5:302023-08-23T15:38:12+5:30
पुणे : खराडी येथील आपले घर परिसरात गेली १० वर्षे पावसाळी स्टॉर्म वॉटर लाईन टाकण्यात अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ, आम ...
पुणे : खराडी येथील आपले घर परिसरात गेली १० वर्षे पावसाळी स्टॉर्म वॉटर लाईन टाकण्यात अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ, आम आमदी पक्षाच्यावतीने बुधवारी नगररोड क्षेत्रीय कार्यालयाबाहेर भीक मांगो आंदोलन करण्यात आले.
खराडी मधील 'आपले घर' परीसरात पावसाळी स्टॉर्म वॉटर पाईपलाईन नसल्याने, परिसरातील नागरिकांच्या घरात दर वर्षी पाच फूट पाणी शिरते. त्यामुळे अनेक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. गेल्या १० वर्षात क्षेत्रीय कार्यालयाशी अनेक वेळा नागरिकांनी पत्रव्यवहार करून देखील कोणतीच उपाययोजना करण्यात आली नाही. अनेक वेळा पाठपुरावा करून निधी उपलब्ध नाही, असे मोघम उत्तर येण्यात येत होते. याच्या विरोधात हे आंदोलन करून महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
आपचे खराडी प्रभाग अध्यक्ष तानाजी शेरखाने व सुनिता शेरखाने यांच्या उपस्थित झालेल्या या आंदोलनात विजय कुंभार, तानाजी शेरखाने, सुनिता शेरखाने, संजय कोणे, अक्षय दावडीकर, शिवाजी डोलारे, डॉ. अभिजित मोरे, सुजित अग्रवाल, मुकुंद किर्दत, सीमा गुट्टे, अमित म्हस्के आदी उपस्थित होते. दरम्यान यावेळी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बनकर यांनी याबाबत तातडीने पावसाळी पाईपलाईन बाबत तातडीने प्रस्ताव बनवून अतिरिक्त आयुक्त व प्रकल्प अधिकाऱ्यांकडे पाठविण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले.