पुण्यात दिव्यांग व्यक्तींचे भीक मागो आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 12:23 PM2021-05-27T12:23:22+5:302021-05-27T12:24:04+5:30
महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग व्यक्तींना राज्य सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर करावे
पुणे: प्रहार संघटना व दिव्यांग संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पोलीस आयुक्तालयाशेजारील दिव्यांग आयुक्तालयाजवळ भीक मागो आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष धमेंद्र सातव, दत्ता मिरगणे, सुप्रिया लोखंडे, युवराज नवले आदी उपस्थित होते.
दीड वर्षांपासून सर्वच कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. गरीब, गरजू, अनेक व्यावसायिक अजूनही आर्थिक अडचणींना सामोरे जात आहेत.
कोरोनाच्या महामारीत अनेक लोकांबरोबर दिव्यांगांचाही रोजगार गेला आहे. तसेच छोटे मोठे व्यवसाय बंद पडल्याने त्यांना अनेक आर्थिक अडचणी येऊ लागल्या आहेत. सरकार गरीब, गरजूना आर्थिक मदत करत आहे. त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यासाठी योग्य ते पाऊल उचलले आहे. अशा महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग व्यक्तींना राज्य सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर करावे. अशी मागणी या भीक मागो आंदोलनातून करण्यात आली आहे.