संभाजीराजे विद्यालयात वृक्षारोपणाने शैक्षणिक वर्षाचा आरंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:14 AM2021-06-16T04:14:23+5:302021-06-16T04:14:23+5:30
तंत्रस्नेही शिक्षण, कौशल्याधिष्ठित उपक्रम, अभ्यासक्रमाचे साप्ताहिक नियोजन, विद्यार्थी व्यक्तिमत्त्वास पूरक सहशालेय उपक्रम यांबाबत विद्यालयाचे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन ...
तंत्रस्नेही शिक्षण, कौशल्याधिष्ठित उपक्रम, अभ्यासक्रमाचे साप्ताहिक नियोजन, विद्यार्थी व्यक्तिमत्त्वास पूरक सहशालेय उपक्रम यांबाबत विद्यालयाचे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी विद्यालयीन वृक्षारोपण समारंभप्रसंगी केले. याप्रसंगी संस्था सचिव प्रकाश पवार म्हणाले, विद्यालयाने वर्षारंभीच केलेले ऑनलाइन तासिकांचे घटकनिहाय नियोजन, डिजिटल क्लासरूम, व्हीडिओ, चित्रफिती, नकाशे, स्वाध्याय, डिजिटल माध्यमांचा वापर अभ्यासकार्यातील रंजकता वाढविणारा आहे. नियोजनबद्ध कार्यामुळे शालेय गुणवत्तेत सातत्याने वाढ होत आहे. याप्रसंगी माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांना वाढदिवस अभिष्टचिंतन करण्यात आले.
या वेळी संचालक सुरेश मोरे, प्राचार्य रामदास थिटे, विभागप्रमुख विजय वरपे, संतोष डफळ, प्राध्यापक कांतीलाल धुमाळ, संगीता ढवळे, गणेश बांगर, रमेश जाधव, शंकर भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो ओळी - शालेय वर्षाचा आरंभ वृक्षारोपणाने करताना माजी आमदार सूर्यकांत पलांडे, संस्था सचिव प्रकाश पवार व उपस्थित मान्यवर. (धनंजय गावडे )