अभियांत्रिकी,फार्मसी,आर्किटेक्चर एमबीए प्रवेशास सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:10 AM2020-12-09T04:10:38+5:302020-12-09T04:10:38+5:30
पुणे: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी) अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर, एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. दिलेल्या ...
पुणे: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी) अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर, एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. दिलेल्या मुदतीमध्ये आॅनलाइन प्रवेश अर्ज न करणा-या विद्यार्थ्यांना नॉन कॅप राऊंडसाठी गृहीत धरले जाणार असल्याचे सीईटी - सेल तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीईटी-सेल तर्फे विविध प्रवेश पूर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेण्यास विलंब झाला.मात्र, नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बहुतांश सर्व पूर्व परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले.त्यामुळे प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. अखेर प्रमुख अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले असून विद्यार्थ्यांना येत्या ९ ते १५ डिसेंबर या कालावधीत प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया सुरू असताना येत्या ४ जानेवारीपासून अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शैक्षणिक कामकाजाला सुरुवात केली जाणार आहे.
सीईटी सेलच्या वेळापत्रकानुसार प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना ९ ते १६ डिसेंबर या कालावधीतपर्यंत कागदपत्रांची पडताळणी करता येईल. येत्या १५ डिसेंबरनंतर प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज करणा-या विद्यार्थ्यांना नॉन कॅप राऊंड साठी गृहीत धरले जाणार आहे. प्राथमिक गुणवत्ता यादी १८ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केल्यानंतर विद्यार्थ्यांना १९ ते २० डिसेंबर या कालावधीत प्राथमिक गुणवत्ता यादी वर आक्षेप नोंदवता येतील. प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी २२ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केल्यानंतर येत्या २३ डिसेंबरपासून पहिल्या कॅप राऊंडला सुरुवात होईल.
अभियांत्रिकी प्रवेशाची पहिली फेरी २३ ते ३१ डिसेंबर या कालावधीत पूर्ण होईल. प्रवेशाच्या दुसया फेरीला येत्या १ जानेवारी पासून सुरुवात होईल. प्रवेशाची दुसरी फेरी ९ जानेवारी पर्यंत चालणार आहे.
----------------------