अतिक्रमण हटविण्यास उपनगरांमध्ये सुरुवात
By admin | Published: April 27, 2017 05:17 AM2017-04-27T05:17:56+5:302017-04-27T05:17:56+5:30
महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या विविध झोनच्या वतीने त्यांच्या कार्यक्षेत्रात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
पुणे : महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या विविध झोनच्या वतीने त्यांच्या कार्यक्षेत्रात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून ही कारवाई सुरू असून त्यात विक्रेत्यांच्या गाड्यांबरोबरच काही पक्की बांधकामेही पाडण्यात आली. एकूण सव्वाचार लाख चौरस फूट क्षेत्र या कारवाईत मोकळे करण्यात आले.
झोन क्रमांक २, ५ व ६ च्या वतीने प्रामुख्याने ही कारवाई झाली. कोंढवा, वडगाव, हिंगणे तसेच शिवाजीनगरच्या काही भागात ही कारवाई झाली. पोलीस बंदोबस्तात झालेल्या या कारवाईत जेसीबी यंत्राच्या साह्याने पक्के बांधकाम पाडण्यात आले. हॉटेल व्यावसायिकांनी अनधिकृतपणे बांधलेल्या शेड, निवासी इमारतींनी बळकावलेल्या जागांवर केलेले बांधकाम यात पाडण्यात आले. रस्ता अडवून उभे असणाऱ्या विक्रेत्यांनाही हटवण्यात आले. (प्रतिनिधी)