वर्षाच्या सुरुवातीलाच पुण्याचा पारा 10 अंशावर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 02:06 PM2020-01-02T14:06:01+5:302020-01-02T14:07:25+5:30
पुणे शहरात यंदाच्या माैसमात पहिल्यादाच पारा 10 अंशावर गेला असून खऱ्या अर्थाने थंडीची चाहूल लागली आहे.
पुणे : संपूर्ण डिसेंबर महिना थंडीविना गेल्यानंतर वर्षाच्या पहिल्याच दिवशी पुण्याचा पारा 10 अंशावर पाेहचला. 1 जानेवारी राेजी पुण्याचा पारा 10.8 अंश सेल्सिअस नाेंदवला गेला. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच पुणेकरांना थंडी अनुभवता आली.
डिसेंबरच्या सुरुवातीपासूनच शहरात थंडीला सुरुवात हाेते. यंदा वातावरणात झालेल्या बदलामुळे डिसेंबरमध्ये देखील पुण्यातील कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली हाेती. वर्षाच्या शेवटपर्यंत किमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त हाेते. 1 जानेवारी राेजी तापमानात कमालीची घट झाली असून शहरातील किमान तापमान 10.8 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. पुढील काही दिवस शहरातील किमान तापमान 10 ते 11 अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. तसेच या काळात आकाश निरभ्र राहण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान शहरात पहिल्यादाच पारा 10 अंशावर गेल्याने नागरिकांची पाऊले स्वेटर तसेच इतर गरम कपडे घेण्यासाठी दुकानांकडे वळालेली दिसून आली.