‘आम्ही एकपात्री महाराष्ट्र’तर्फे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:14 AM2021-03-09T04:14:52+5:302021-03-09T04:14:52+5:30

पुणे : कोणतेही कार्य उभे राहण्यामागे महिलांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष श्रमाचा आधार असतोच. त्याच श्रमाचा गाैरव करण्यासाठी सोमवारी (दि.८) जागतिक ...

On behalf of ‘Amhi Ekpatri Maharashtra’ | ‘आम्ही एकपात्री महाराष्ट्र’तर्फे

‘आम्ही एकपात्री महाराष्ट्र’तर्फे

googlenewsNext

पुणे : कोणतेही कार्य उभे राहण्यामागे महिलांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष श्रमाचा आधार असतोच. त्याच श्रमाचा गाैरव करण्यासाठी सोमवारी (दि.८) जागतिक महिला दिनानिमित्त ‘आम्ही एकपात्री महाराष्ट्र’तर्फे श्रमसंस्काराचा प्रतीकात्मक सत्कार करण्यात आला.

दहा वर्षांपूर्वी ज्या हॉटेलमध्ये ‘आम्ही एकपात्री महाराष्ट्र’ची स्थापना केली. त्याच हाॅटेलमध्ये पोळ्या करणाऱ्या समिता बोबले यांचा विशेष सत्कार संस्थापक सदस्य वंदन नगरकर आणि महिला सदस्यांच्या हस्ते सत्कार केला. यावेळी चंद्रकांत परांजपे, अनुपमा खरे, शेखर केदारी, निलाक्षी दलाल, नितीन दलाल, केदारनाथ भागवत, सुनीता निजामपूरकर, नीता मुधाळे आणि अनिरुद्ध देवकर उपस्थित होते.

‘आम्ही एकपात्री महाराष्ट्र’तर्फे नेहमीच सामाजिक भान ठेवून मनोरंजनातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला जातो. व्यवसायिक दृष्टीकोन न बाळगता मनोरंजन, विनोद, एकपात्री, मिमक्री, काव्य वाचन, गायन, नृत्य, जादू, वादन आणि कथाकथन आदी मार्गांनी समाजात सकारात्मकता पेरण्याचे काम संस्थेतर्फे सातत्याने होत असल्याचे नगरकर यांनी यावेळी सांगितले.

Web Title: On behalf of ‘Amhi Ekpatri Maharashtra’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.