बारामती क्रेडाईच्या वतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:11 AM2021-04-23T04:11:08+5:302021-04-23T04:11:08+5:30
बारामती: वाढत्या कोरोना रुग्णांमुळे धास्तावलेल्या बारामतीकरांना मदत देण्यासाठी अनेक उद्योजक, सामाजिक संस्था पदाधिकारी सरसावले आहेत. बारामती येथील क्रेडाईच्या ...
बारामती: वाढत्या कोरोना रुग्णांमुळे धास्तावलेल्या बारामतीकरांना मदत देण्यासाठी अनेक उद्योजक, सामाजिक संस्था पदाधिकारी सरसावले आहेत. बारामती येथील क्रेडाईच्या वतीने बारामती नगर परिषदेस अंत्यसंस्कारासाठी दोन शवदाहिनी सुपूर्त करण्यात आल्या.
क्रेडाई बारामती ही बांधकाम व्यावसायिकांची संघटना असून बांधकाम क्षेत्राशी निगडित अनेक विषयांवर काम करीत आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर बारामती नगर परिषदेच्या संपूर्ण यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. यातच कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्याही वाढली आहे. त्यामुळे बारामती नगर परिषद हद्दीमधील स्मशानभूमीमध्ये शवदाहिनींची संख्या अपुरी पडत आहे. ही बाब आज सकाळी बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी क्रेडाईच्या निदर्शनास आणून दिली ,तसेच क्रेडाई बारामतीकडून नगर परिषदेस जळोची स्मशानभूमीमध्ये दोन शवदाहिनी देण्याचे आवाहन केले. यावर नगर परिषदेने केलेल्या या आवाहनास प्रतिसाद देत तात्काळ दोन शवदाहिनी क्रेडाई बारामातीकडून मुख्याधिकारी यादव बारामती नगर परिषद, यांच्याकडे जळोची येथील स्मशानभूमीमध्ये सुपूर्त केल्या.
या प्रसंगी क्रेडाई बारामतीचे अध्यक्ष सुरेंद्र भोईटे, सचिव राहुल खाटमोडे, खजिनदार भगवान चौधर, कार्यकारिणी सदस्य प्रफुल्ल तावरे, चंद्रकांत शिंगाडे, दीपक काटे हे पदाधिकारी उपस्थित होते.
बारामती येथील क्रेडाईच्या वतीने बारामती नगर परिषदेस अंत्यसंस्कारासाठी दोन शवदाहिनी सुपूर्त करण्यात आल्या.
२२०४२०२१ बारामती—१६