‘पुनर्वसन प्रकल्प बंद’वर घमासान
By admin | Published: April 7, 2015 05:41 AM2015-04-07T05:41:19+5:302015-04-07T05:41:19+5:30
झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम थंडावल्याने व जेएनएनयूआरएमचा झोपडपट्टी पुनर्वसनाचा निधी केंद्राकडे परत गेल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर
पिंपरी : झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम थंडावल्याने व जेएनएनयूआरएमचा झोपडपट्टी पुनर्वसनाचा निधी केंद्राकडे परत गेल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर सोमवारच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी जोरदार टीका केली. प्रशासनास धारेवर धरले. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प बंद करून झोपडपट्टीवासीयांना बेघर करू नये, अशी मागणी सदस्यांनी केली. ‘आम्हाला घर द्या,’ अशा आशयाच्या टोप्या घालून सदस्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. याबाबतचा विषय तहकूब ठेवण्यात आला.
प्राधिकरण सेक्टर क्रमांक २२मधील निगडी, लिंक रोड पत्राशेड, मिलिंदनगर, वेताळनगर, अजंठानगर, उद्योगनगर येथे पुनर्वसन प्रकल्प सुरू आहेत. हे प्रकल्प थांबविण्याचा प्रस्ताव सभेपुढे ठेवला होता. या संदर्भात अश्विनी चिंचवडे यांनी प्रशासनाला काही प्रश्नही
विचारले होते. यानंतर शमीम पठाण, दत्ता साने, उल्हास शेट्टी यांनी
सहभाग घेतला. या वेळी प्रकल्पांकडे झालेल्या दुर्लक्षाची माहिती सदस्यांनी सभेस दिली. (प्रतिनिधी)