एकटे असल्याने ज्येष्ठ करताहेत आत्महत्येचा विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:09 AM2021-07-25T04:09:53+5:302021-07-25T04:09:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मुले परदेशात वास्तव्यास असल्याने ज्येष्ठ आई-वडील घरात एकटेच राहात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...

Being alone, seniors are thinking of committing suicide | एकटे असल्याने ज्येष्ठ करताहेत आत्महत्येचा विचार

एकटे असल्याने ज्येष्ठ करताहेत आत्महत्येचा विचार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मुले परदेशात वास्तव्यास असल्याने ज्येष्ठ आई-वडील घरात एकटेच राहात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यात जर आयुष्यभर साथ देणाऱ्या एकाची जरी सावली दुरावली, तर दुसऱ्यानं एकटं जगायचं कसं? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळे एकटे ज्येष्ठ जोडीदाराअभावी आत्महत्येचा मार्ग स्वीकारताना दिसत आहेत. भरोसा सेलकडे शहरातील जवळपास १९,०५० ज्येष्ठ नागरिक नोंदणीकृत असून, त्यातील ६५० नोंदणीकृत ज्येष्ठ नागरिक एकटे राहत आहेत. शहराची लोकसंख्या ४० लाखांच्या आसपास असूनही त्या तुलनेत ज्येष्ठांची नोंदणी निम्म्यानेदेखील झालेली नसल्याचे दिसून येत आहे.

अनेक कुटुंबांत ज्येष्ठांकडे 'आधार' म्हणून न पाहता 'अडचण' म्हणून पाहण्याची प्रवृत्ती बळावली आहे. त्यामुळे ज्येष्ठांची शारीरिक, मानसिक, आर्थिक पिळवणूक वाढली आहे. ज्येष्ठांना मदतीचा हात देण्यासाठी भरोसा सेलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कक्ष स्थापन केला आहे. एकटेपणामुळे अनेकदा त्यांच्या मनात वैफल्य वा आपल्याला मदत करणारे कोणीही नसल्याची भावना असते. त्यांना भरोसा सेलकडे सर्वतोपरी मदत केली जात आहे. त्यांना कुटुंबात कोणत्याही स्वरूपाचा मानसिक, शारीरिक किंवा इतर कोणताही त्रास दिला जात असल्यास ते भरोसा सेलकडे तक्रार करू शकतात. त्यानुसार भरोसा सेलकडे गेल्या सहा महिन्यांत ४५० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी २८२ तक्रारी मानसिक आणि शारीरिक फसवणुकीच्या असल्याचे सांगण्यात आले आहे.

------------------------

ज्येष्ठांना दिली जाते मदत आणि सुविधा

'भरोसा सेल'मार्फत ज्येष्ठांच्या सर्व अडीअडीचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. लॉकडाऊनमध्ये त्यांना जीवनावश्यक वस्तू आणण्यास मदत करणे, औषधे आणून देणे, त्यांच्याशी संवाद साधणे, एकटेपणा दूर करण्याचा प्रयत्न करणे या गोष्टी प्रामुख्याने केल्या जात आहेत.

--------------------------

भरोसा सेलच्या माध्यमातून ज्येष्ठांना मदतीचा हात दिला जातो. त्यासाठी १०९० ही हेल्पलाइन २४ तास आणि सातही दिवस कार्यरत आहे. दररोज सरासरी वीस लोकांना फोन करून भरोसा सेलबद्दलची माहिती दिली जाते. ज्येष्ठांना एकटेपणा जाणवू नये यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जातो.

- राजेंद्र कदम, प्रमुख, भरोसा सेल

----------------------------

Web Title: Being alone, seniors are thinking of committing suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.