Video : लज्जास्पद ! पुण्यातील मॉलमध्ये तृतीयपंथीयाला नाकारला प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 01:27 PM2018-03-17T13:27:10+5:302018-03-17T15:55:02+5:30

एकीकडे विद्येचे माहेरघर आणि पुरोगामीत्वाचा वसा सांगणाऱ्या पुणे शहरातील फिनिक्स मार्केट सिटी मॉलमध्ये तृतीयपंथी व्यक्तीला प्रवेश नाकारण्यात आला. सोनाली यांचे शिक्षण एमबीए फायनान्स इतके झाले असून त्यांना खरेदीसाठी गेल्यावर या अनुभवाला सामोरे जावे लागले.

being transgender denied entry in mall | Video : लज्जास्पद ! पुण्यातील मॉलमध्ये तृतीयपंथीयाला नाकारला प्रवेश

Video : लज्जास्पद ! पुण्यातील मॉलमध्ये तृतीयपंथीयाला नाकारला प्रवेश

Next
ठळक मुद्देतृतीयपंथी म्हणून पुण्यातील मॉलमध्ये नाकारला प्रवेश व्हिडीओ बघून सोशल मीडियावर नागरिकांचा संताप

पुणे : केवळ तृतीयपंथी आहे म्हणून प्रवेश नाकारण्याची घटना पुण्यातील फीनिक्स मॉलमध्ये घडली आहे.आत कार्यक्रमासाठी आले आहे असं वारंवार सांगूनही सुरक्षा रक्षकांनी सोडले गेले नसल्याचा अनुभव उच्चशिक्षित तृतीयपंथी सोनाली यांना आला. मित्रासह गुढीपाडव्यानिमित्त खरेदीसाठी गेलेल्या सोनाली यांना सुरक्षारक्षकांनी मॉलमध्ये प्रवेश नाकारला. यापूर्वी येथे येवून गेल्याचे वारंवार सांगूनही त्यांना आतमध्ये सोडण्यात आले नाही. त्यांच्यासोबत असलेल्या काही व्यक्तींनी या घटनेचे चित्रण करून सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे संबंधित प्रकार उघड झाला. दरम्यान सोनाली दळवी यांनी एमबीए फायनान्सपर्यंत शिक्षण घेतले असून त्या आशीर्वाद सामाजिक संस्थेसाठी काम करता. 

याविषयी सोनाली यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे सांगितले. मी तिथून निघून जाण्याचा पर्यायही स्वीकारू शकले असते परंतु तिथे थांबून त्यांच्या मानसिकते विरोधात लढा देणे महत्वाचे वाटले. मी इतक्यावर थांबणार नसून या प्रकरणी कायदेशीर लढाई लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत फिनिक्स प्रशासनाशी संपर्क केला असता त्यांनी यापूर्वी तृतीयपंथ्याकडून आलेल्या अनुभवामुळे प्रवेश नाकारण्यात आल्याचे सांगितले.सुरक्षेच्या कारणास्तव प्रवेश नाकारण्यात आला असून त्यांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता अशी सारवासारव व्यवस्थापक सी.पी.पोरवाल यांनी केली. 



 



 

Web Title: being transgender denied entry in mall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.