तिसऱ्या लाटेची घंटा वाजली; तयारी कुठवर ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:10 AM2021-07-17T04:10:21+5:302021-07-17T04:10:21+5:30

पुणे : कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. जिल्ह्यात या पार्श्वभूमीवर तयारीला वेग ...

The bell of the third wave rang; Where is the preparation? | तिसऱ्या लाटेची घंटा वाजली; तयारी कुठवर ?

तिसऱ्या लाटेची घंटा वाजली; तयारी कुठवर ?

googlenewsNext

पुणे : कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. जिल्ह्यात या पार्श्वभूमीवर तयारीला वेग आला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने खाटा, ऑक्सिजन सिलिंडर, व्हेंटिलेटर, औषधे अशा सर्वच स्तरांवर तुटवडा निर्माण झाला. यंत्रणा अपुरी पडत असल्याने रुग्णांची ससेहोलपट आणि प्रशासन यंत्रणेची तारेवरची कसरत झाली. यातून धडा घेऊन जिल्ह्यात सहा हजारांहून अधिक खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. २८ हजार ७६८ एलपीएम क्षमतेचे ४३ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प प्रस्तावित आहेत. लहान मुलांसाठी स्वतंत्र रुग्णालयांची व्यवस्था करण्यात येत आहे.

तिसरी लाट रोखायची असेल असेल तर लसीकरणाचा वेग वाढवणे आवश्यक असल्याचे वैद्यकतज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या जिल्ह्यात ४३ टक्के लोकांचा पहिला डोस तर १३ टक्के लोकांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. दररोज किमान १ लाख नागरिकांचे लक्ष्य समोर ठेवून यंत्रणेला काम करावे लागणार आहे. सध्या खासगी रुग्णालयांमध्ये अडीच लाखांहून अधिक डोस शिल्लक असल्याचे सांगितले जात आहे, तर शासकीय रुग्णालयांना लसींचा नियमित पुरवठा होत नसल्याने अनेक केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत.

--------

जिल्ह्यातील रुग्णसंख्या

बाधित रुग्ण - १०,७३,५४७

बरे झालेले रुग्ण - १०,३८,५८४

सक्रिय रुग्ण - १७,०९६

मृत्यू - १७,६०९

------

१८ वर्षांवरील १३ टक्के लोकांचेच दोन्ही डोस पूर्ण

१८ वर्षावरील एकूण लोकसंख्या : ९६,७७,७९५

एकूण लसीकरण - ५३,४३,११८

पहिला डोस - ४१,१५,४४१ (४३ टक्के)

दोन्ही डोस - १२,२७,६७७ (१३ टक्के)

-----

तिसऱ्या लाटेची तयारी

तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी नवीन बाणेर रुग्णालयात रुग्ण भरती करणे शक्य होणार आहे. यासाठी जम्बो रुग्णालयातील स्टाफ बाणेर येथे स्थलांतरीत करण्यात आला आहे. राजीव गांधी रुग्णालय, येरवडा येथे लहान मुलांसाठी स्वतंत्र कोविड रुग्णालय विकसित करण्यात आले आहे. पुणे मनपा अंतर्गत बालरोगतज्ज्ञ यांची भरती करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

-----------------------------

खाटांचे नियोजन :

शासकीय खासगी

पुणे १७१० १७१९

पिं. चिं. १११० ८१३

ग्रामीण ६५९ १५५

-------

एकूण ३४६९ २६८७

---------------

ऑक्सिजन जनरेशन प्लांट प्रस्तावित :

कार्यक्षेत्र संख्या क्षमता (एलपीएम)

पुणे ११ ९९३३

पिं. चिं. ५ ४५५०

ग्रामीण २५ १२२७५

-----

एकूण ४३ २८,७६८

-----

तिसऱ्या लाटेसाठी यंत्रणा सज्ज

“कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नव्याने अनेक ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून अनेक प्रकल्पांचे काम पूर्णदेखील झाले आहे. याशिवाय हाॅस्पिटल व खाटांचे नियोजन, लहान मुलांसाठी विशेष सोयी-सुविधासह खाटा हे नियोजन पूर्ण झाले आहे. यामुळे सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्रशासनाची पूर्ण तयारी सुरू तिसऱ्या लाटेसाठी यंत्रणा सज्ज आहे.”

- डाॅ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

Web Title: The bell of the third wave rang; Where is the preparation?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.