म्हाडासह लाभार्थ्यांची फसवणूक; बांधकाम व्यावसायिकाची येरवडा कारागृहात रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 10:06 AM2023-03-09T10:06:27+5:302023-03-09T10:06:35+5:30

करारानुसार लाभार्थ्यांना २० सप्टेंबर २०२० पर्यंत इमारतीचे बांधकाम पूर्ण करून ताबा देणे बंधनकारक होते. मात्र ताबा दिला नाही

Beneficiary fraud including MHADA; Builder sent to Yerawada Jail | म्हाडासह लाभार्थ्यांची फसवणूक; बांधकाम व्यावसायिकाची येरवडा कारागृहात रवानगी

म्हाडासह लाभार्थ्यांची फसवणूक; बांधकाम व्यावसायिकाची येरवडा कारागृहात रवानगी

googlenewsNext

पुणे : पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण, म्हाडासह लाभार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिस स्टेशन येथे बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने फेटाळल्याने बांधकाम व्यावसायिकाची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

भूमी कन्स्ट्रक्शनचे पंकज प्रकाश येवला (वय ३५, रा. रहाटणी, पुणे) असे बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. याबाबत म्हाडाचे मिळकत व्यवस्थापक विजय शंकर ठाकूर यांनी बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती.

शासनाच्या नियमानुसार चार हजार चौरस मीटर क्षेत्रफळापेक्षा जास्त क्षेत्रफळातील मंजूर अभिन्यासात एकूण क्षेत्रफळाच्या २० टक्के क्षेत्रफळावर विकसकाने अत्यल्प व अल्प उत्पन्न गटाअंतर्गत सदनिका म्हाडाला उपलब्ध करून देणे बंधनकारक होते. त्यानुसार मे २००९ मध्ये म्हाडाने काढलेल्या लॉटरीत भूमी कन्स्ट्रक्शनतर्फे पंकज येवला यांनी सादर केले.

या प्रस्तावातील भूमी ब्लेसिंग या प्रकल्पाचादेखील समावेश होता. म्हाडाने त्या अनुषंगाने निर्धारित नियमानुसार लॉटरी काढून जून २०१९ मध्ये लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली. त्यानुसार लाभार्थ्यांना देकार पत्र देण्यात आले होते. लाभार्थी व विकसक यांच्यात करारनामा झाल्यानंतर सदनिकेचा मोबदला म्हणून ७० टक्के रक्कम प्राप्त झाली होती. पंकज येवला यांनी करारानुसार लाभार्थ्यांना २० सप्टेंबर २०२० पर्यंत इमारतीचे बांधकाम पूर्ण करून ताबा देणे बंधनकारक होते. मात्र येवला यांनी ताबा दिला नाही. वारंवार ताबा मिळण्यासाठी उशीर होत असल्याच्या कारणातून लाभार्थी यांनी ११ डिसेंबर २०२० रोजी तक्रार केली होती. त्यानंतर इतर लाभार्य्यांनी याबाबत म्हाडाकडे तक्रारी केल्या होत्या.

येवला यांच्यासोबत पुणे म्हाडाचे मुख्य अधिकारी यांनी बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी ३१ मार्च २०२२ च्या अगोदर सर्व लाभार्थ्यांना सदनिकेचा ताबा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरदेखील येवला यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी उपोषणास बसणार असल्याचे नोटीसद्वारे कळविले होते. हा सर्व प्रकार लक्षात आल्यावर म्हाडाच्या संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. म्हाडातर्फे विधी सल्लागार ॲड शशिकांत ठाकूर, पुणे मंडळ व मालेगावकर ॲड. असोसिएटसतर्फे ॲड. सिद्धांत मालेगावकर यांनी कामकाज पाहिले. ही संपूर्ण कार्यवाही पुणे मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

''२० टक्के योजनेत किंवा म्हाडाच्या जमिनी बळकावणाऱ्या भूमाफिया व तथाकथित विकसक यांच्यावर यापुढे देखील कठोर कार्यवाही करण्यात येईल. - ॲड. श्रीकांत ठाकूर, विधी सल्लागार, म्हाडा पुणे मंडळ.'' 

Web Title: Beneficiary fraud including MHADA; Builder sent to Yerawada Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.