कोरोनाचा फायदा, शुभंकरोती पाठ अन् नमाजाचे पठण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:12 AM2021-09-22T04:12:21+5:302021-09-22T04:12:21+5:30

(स्टार १२०६ डमी) लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाकाळात मुले घरात थांबल्याने मुलांमध्ये धार्मिक संस्कारांची मुळे अधिक रुजण्यास मदत ...

Benefit of Corona, Recitation of Shubhankaroti Annamaja! | कोरोनाचा फायदा, शुभंकरोती पाठ अन् नमाजाचे पठण!

कोरोनाचा फायदा, शुभंकरोती पाठ अन् नमाजाचे पठण!

googlenewsNext

(स्टार १२०६ डमी)

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनाकाळात मुले घरात थांबल्याने मुलांमध्ये धार्मिक संस्कारांची मुळे अधिक रुजण्यास मदत झाली आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन लावण्यात आल्याने शहरातील मंदिरे, मशिदी तसेच चर्च बंद करण्यात आली हाेती. त्यामुळे आई - वडिलांबरोबर मुलेही घरातच अडकून पडली. याचा सदुपयोग म्हणून ऑनलाईन पद्धतीने गायत्री मंत्र, कुरआन पठण आणि बायबलचे वाचन सुरू करण्यात आल्याने अनेक मुलांना ते तोंडपाठ झाले असून, आता ते नित्यनियमाने पठण करत आहेत.

कोरोना काळात कडक लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. त्याचा परिणाम प्रत्येक घरावर झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, यातही अनेकांनी विधायक उपक्रम राबवित मुलांवर संस्कार केले. शहरातील मंदिरे, मशिदी आणि चर्चदेखील या काळात बंद होती. मात्र, घरी असले तरी ऑनलाईनच्या माध्यमातून संस्कार सुरू होते.

----

* प्रत्येक धर्मात संस्कारांचे धडे

हिंदू -

लॉकडाऊनमुळे मंदिरे बंद असल्याने मुलांना बाहेर पडणे शक्य नव्हते. त्यामुळे अनेक पालकांनी घराघरात मुलांना गायत्री मंत्र, हनुमान स्तोत्र पठण तसेच गीता पठण शिकवले. काही ऑनलाईन वर्ग केल्याचाही मोठा फायदा झाल्याचे अनेक पालकांनी सांगितले.

----

मुस्लीम -

कोरोनाकाळात सर्वजण घरात होते. कडक लॉकडाऊनच्या काळात मुलांना संस्कार कसे द्यायचे, हा प्रश्न होता. शाळा, मशिदी बंद असल्याने मुलांना घरीच कुरआन, हदिस, नमाज पठण शिकवले जात होते.

----

ख्रिश्चन -

नियमित शास्त्रपाठ (बायबल) वाचणे. भक्तीपर गाणी शिकवणे. पवित्र शास्त्रातील धडे आणि गोष्टी लेकरांना समजावून सांगणे. लेकरांना प्रार्थना करायला शिकवणे आणि मुलांकडून ती प्रार्थना आणि स्तोत्रे म्हणवून घेणे.

----

* तीन कोट्स

शुभंकरोती, गायत्री मंत्राचे ऑनलाईन अन घरीही पठण

मंदिरे बंद असल्याने नियमित होणारे संस्कारांचे कार्यक्रम या काळात बंद होते. विशेषत: दर शनिवारी हनुमान मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमांवर बंधने आली. मात्र, या काळात हनुमान स्तोत्र पठणचे मुलांना घरीच धडे देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. काही वेळेस आम्ही ऑनलाईन स्तोत्र पठणाचे कार्यक्रम घेतले.

- काशिनाथ धारणे, पुजारी, हनुमान मंदिर

----

कुरआन व हदिस संस्कारांचे ऑनलाईन प्रशिक्षण

मशिदीचा इमाम म्हणून जेव्हा जबाबदारी येते तेव्हा ते कर्तव्य पार पाडण्यासाठी कष्ट करावे लागतात. लॉकडाऊनमध्ये सर्व परिस्थिती बदलली. मुले कुरआन शिकण्यासाठी मशिदीत येत होती, ती मशिदच बंद झाली. मदरसे बंद झाले. शारीरिक अंतर अनिवार्य झाले. अशा परिस्थितीत मुलांना कुरआनचे व हदिस संस्कारांचे ऑनलाईन प्रशिक्षण चालू केले.

- मौलाना गुलाम अहमद कादरी, अध्यक्ष, सिरत कमिटी, पुणे

----

कठीण काळात प्रार्थना करण्याची प्रेरणाही मिळाली

कोरोना काळात पूर्ण कुटुंबाला एकत्रपणे वेळ घालवता आल्याने पवित्र बायबल वाचन, पाठांतर, गीते गाणे व कौटुंबीक प्रार्थना यांनी केवळ धार्मिक वातावरण तयार झाले नाही तर, इतरांच्या गरजा, आजार, मृत्यु, दुःख याचीही जाणीव झाली. अडचणीतल्या शेजाऱ्यांना मदत करणे व त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याची प्रेरणाही मिळाली.

- रेव्ह. प्रशांत गोर्डे, ख्रिश्चन फेलोशिप सेंटर चर्च, वडगावशेरी

----

* तीन फोटो

१) हिंदू धर्मातील शुभंकरोतीचे पठण करताना मुले.

२) मुस्लिम धर्मातील नमाज पठण करताना मुले.

३) बायबलचा अभ्यास करताना मुले.

Web Title: Benefit of Corona, Recitation of Shubhankaroti Annamaja!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.