पुणे महापलिका करदात्याच्या संपूर्ण कुटुंबाला अपघात विमा योजनेचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 12:08 PM2019-05-29T12:08:58+5:302019-05-29T12:12:26+5:30

पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजने अंतर्गत आता नियमित मिळकतकर भरणा-या करदात्यांच्या संपूर्ण कुटुंबाला आता विमा योजनेचा लाभ मिळणार आहे.

Benefits of Accident Insurance Scheme to the entire family of the Pune Municipal Corporation tax payer | पुणे महापलिका करदात्याच्या संपूर्ण कुटुंबाला अपघात विमा योजनेचा लाभ

पुणे महापलिका करदात्याच्या संपूर्ण कुटुंबाला अपघात विमा योजनेचा लाभ

Next
ठळक मुद्देस्थायी समितीच्या बैठकीत योजनेच्या पुनर्रचनेस मान्यता संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाला तब्बल ५ लाख रुपयांचे विमा संरक्षण

पुणे:  महापालिकेच्या वतीने गतवर्षी सुरु केलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजने अंतर्गत आता नियमित मिळकतकर भरणा-या करदात्यांच्या संपूर्ण कुटुंबाला आता विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. यामध्ये कुटुंबाप्रमुखासह त्याची पत्नी, आई-वडील व दोन मुलांना विम्याचे कवच मिळणार आहे. यामध्ये प्रथमच झोपडपट्टीमध्ये राहणा-या कुटुंबाला देखील योजनेचा लाभ मिळणार आहे. मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत योजनेच्या पुनर्रचनेस मान्यता देण्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष सुनील कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
    महापालिकेत सत्तेवर आल्यानंतर भारतीय जनता पार्टीने आपल्या पहिल्या अंदाजपत्रकामध्ये नियमित कर भरणाऱ्या करदात्यांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना सुरु करण्यात आली. त्यानंतर सन २०१८-१९ मध्ये योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु करण्यात आली. या योजने अतंर्गत ज्याच्या नावावर मिळकत असले व नियमित मिळकत कर भरणा-या करदात्या व्यक्तीचा अपघाती मृत्यु झाल्यास अथवा अपघाताने कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाला तब्बल ५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे. पहिल्याच वर्षी केवळ १५ करदात्यांनी विमा योजनेचा लाभ देखील घेतला आहे. विमा योजनेचा प्रिमेअर भरण्यासाठी तब्बल ५ कोटी रुपये खर्च करण्यात आले. परंतु आता संपूर्ण कुटुंबाला विमा योजनेचे संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला.  सन २०१९-२० वर्षांत विमा योजनेसाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये ७ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. 
---------------
असा मिळणार लाभ
- मिळकतकर दात्याचा किंवा त्याच्या पती/पत्नीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसाला पाच लाख रुपये मिळणार
- मिळकतकर धारकावर अवलंबून असलेल्या २३ वर्षांखालील पहिल्या दोन पाल्यास अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला अडीच लाख मिळणार
 - मिळकत धारकाच्या आई किंवा वडलांचा अपघाती मृत्यू झाल्यास अडीच लाख 
- कुटुंबातील व्यक्तीला अपघात झाल्यास उपचारासाठी १ लाख रुपये मिळणार
- रुग्णवाहिकेसाठी देखील तीन हजार रुपये मिळणार
- झोपडपट्टीतील कुटुंबाला गवनि पवतीनुसार लाभ मिळणार
-------------------------
यांना मिळणार लाभ
महापालिकेचा करसंकलन विभाग आणि गवनि विभागाकडील प्राप्त आकडेवारीनुसार मार्च २०१९ पर्यंत मिळकतकर व सेवाशुल्क भरणा-यांची ६ लाख ७८ हजार ९० इतकी आहे. गेल्या आर्थिक वषार्तील मिळकतकर किंवा सेवाशुल्क भरल्याची पावती व आवश्यक ती कागदपत्रे सादर केल्यानंतर दावा मान्य केला जाणार आहे. वार्षिक प्रीमिअय अदा केल्याच्या तारखेपासून वर्षभरासाठी विमा कालावधी असणार आहे. यासाठी दि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडला प्रती व्यक्ती ७५ रुपये याप्रमाणे ५ कोटी ८ लाख ५६ हजार रुपये अदा करण्यास मान्यता देण्यात आली.

Web Title: Benefits of Accident Insurance Scheme to the entire family of the Pune Municipal Corporation tax payer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.