सर्वेश सुभाष नावंदे याला बेस्ट कॅडेट सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 03:55 AM2018-01-30T03:55:06+5:302018-01-30T03:55:33+5:30
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाच्या निमित्ताने पंतप्रधान रॅलीमध्ये पुण्याचा सर्वेश सुभाष नावंदे याला भारतातून एअर फोर्स विंगमध्ये बेस्ट कॅडेट सुवर्णपदक मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले.
पुणे : प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाच्या निमित्ताने पंतप्रधान रॅलीमध्ये पुण्याचा सर्वेश सुभाष नावंदे याला भारतातून एअर फोर्स विंगमध्ये बेस्ट कॅडेट सुवर्णपदक मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले.
सर्वेश मॉडर्न कॉलेजमध्ये बीएस्सी द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी सर्वेश ने आरडी कॅम्पमध्ये आपला सहभाग नोंदविला. नोव्हेंबर २०१७ मध्ये सर्वेशची निवड पुढील कॅम्पसाठी औरंगाबाद येथे झाली. महाराष्ट्रातून ११२ कॅडेट यामध्ये सहभागी झाले होते.
सर्वप्रथम महाराष्ट्रामधून सर्वेशची बेस्ट कॅडेट म्हणून निवड झाली. तदनंतर संपूर्ण भारतातून दिल्लीमध्ये १७ डिरेक्टरेटचे २,५०० पेक्षा जास्त कॅडेट यामध्ये सहभागी झाले होते. या सर्वांसोबत सर्वेशची स्पर्धा होती. यामध्ये लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, मुलाखत या सर्वांमध्ये सर्वेशने एअर फोर्स विंगमध्ये प्रथम येणाचा बहुमान प्राप्त केला. संपूर्ण भारतातून एअर फोर्स विंगमध्ये बेस्ट कॅडेट सुवर्णपदक प्राप्त झाले.