उत्तम शारीरिक, मानसिक आरोग्य आवश्यक - गौर गोपालदास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 02:00 AM2018-08-14T02:00:26+5:302018-08-14T02:00:54+5:30
उत्तम आयुष्यासाठी शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले असणे आवश्यक असल्याचे मत जीवनशैलीचे आंतरराष्टÑीय भाष्यकार गौर गोपालदास यांनी व्यक्त केले.
पुणे : उत्तम आयुष्यासाठी शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले असणे आवश्यक असल्याचे मत जीवनशैलीचे आंतरराष्टÑीय भाष्यकार गौर गोपालदास यांनी व्यक्त केले.
‘लोकमत’ आणि ‘फिक्की फ्लो पुणे चॅप्टर’च्या संयुक्त विद्यमाने, गोपालदास यांच्या विशेष संवादपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘फिक्की फ्लो पुणे चॅप्टर’ व ‘लोकमत’ सखी प्रिव्हिलेज क्लबच्या तीनशेहून अधिक सदस्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. गौर गोपालदास यांनी आजच्या काळात आनंदी राहण्याबाबत मार्मिक भाष्य केले. अभ्यासपूर्ण आणि विनोदी शैलीत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. मानवी जीवनात अध्यात्माचे आणि आनंदी जीवनाचे महत्त्व त्यांनी सांगितले. शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य व व्यावसायिक आरोग्य या त्रिसूत्रींवर गौर गोपालदास यांनी प्रकाश टाकला.
अध्यात्माची जोड मानवी आयुष्याला नवीन आयाम प्राप्त करून देते. गौर गोपालदास यांनी खरोखरच या विषयावर अप्रतिम भाष्य केले.
- प्रकाश छाब्रिया, कार्यकारी अध्यक्ष, फिनोलेक्स इंडस्ट्रीज
आनंदाची खरी परिभाषा कळणे हे आत्यंतिक गरजेचे आहे. या अनुषंगाने गौर गोपालदासजी यांनी केलेले भाष्य अत्यंत आनंददायी व उद्बोधक आहे. - संगीता लालवाणी, अध्यक्षा, फिक्की फ्लो पुणे