संजय रणदिवे यांना उत्कृष्ट तंत्रस्नेही शिक्षक पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:10 AM2021-09-11T04:10:19+5:302021-09-11T04:10:19+5:30
खोडद : एज्युतंत्र राज्यस्तरीय डिजिटल शैक्षणिक मासिक यांच्या मार्फत मांजरवाडी (ता.जुन्नर) येथील अष्टपैलू शिक्षक संजय रणदिवे यांना पुणे जिल्हा ...
खोडद : एज्युतंत्र राज्यस्तरीय डिजिटल शैक्षणिक मासिक यांच्या मार्फत मांजरवाडी (ता.जुन्नर) येथील अष्टपैलू शिक्षक संजय रणदिवे यांना पुणे जिल्हा उत्कृष्ट तंत्रस्नेही शिक्षक पुरस्कार ‘पुणे एज्यु. लीडर अवॉर्ड २०२१’ एज्युतंत्र मासिकाचे संपादक उमेश धावारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
प्रत्येक तालुक्यातील एक सर्वगुणसंपन्न शिक्षकाची यासाठी निवड करण्यात आली होती. तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील शिक्षक भवनात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार प्राप्त शिक्षिका मृणाल गांजाळे, तंत्रस्नेही प्रेरक नागनाथ विभुते, अनिल पलांडे, उमेश धावारे, संदीप आढाव आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरोनाच्या काळात संजय रणदिवे यांनी मुलांच्या शिक्षणासाठी १०० लॅपटॉप उपलब्ध करून दिले होते, तर एमएससीआयटीचे मूलभूत शिक्षण देण्यात आले. ‘मुलांना घरातच सुरू झाली ऑनलाइन शाळा’ या उपक्रमात जिल्हा परिषद लाइव्ह एज्युकेशन या ॲप निर्मितीसही योगदान आणि अध्यापनात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत जुन्नर तालुक्यातील सर्वाधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती व नवोदयमध्ये रणदिवे यांचे योगदान असल्याने त्यांना या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी मुख्य आयोजक पृथ्वीराज काळे, सागर शिंदे, गणेश शिंदे, नामदेव पांचाळ, बाळासाहेब कांदळकर आदी उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याने जिल्हा नियोजन समिती सदस्य माउली खंडागळे, सरपंच मनीषा मुळे, उपसरपंच संतोष मोरे, व्यवस्थापन अध्यक्ष किरण थोरात, उपाध्यक्ष सुषमा मुळे, गटशिक्षण अधिकारी अनिता शिंदे, किसन खोडदे, दीपक कोकतरे यांनी कौतुक केले.
100921\picsart_09-10-01.34.27.jpg
कॅप्शन : संजय रणदिवे यांना पुणे जिल्हा उत्कृष्ट तंत्रस्नेही शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.