संपत्तीच्या वादातून सख्ख्या मेव्हण्याला मारण्यासाठी पैलवानांना सुपारी, आपटे रोडवर तरुणावर हल्ला

By विवेक भुसे | Published: March 25, 2024 11:37 AM2024-03-25T11:37:14+5:302024-03-25T11:39:03+5:30

याबाबत एका ३१ वर्षाच्या तरुणाने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या तरुणाचे आपटे रोडवर हॉटेल आहे...

Betel nut to wrestlers to kill brother-in-law due to property dispute, youth attacked on Apte Road | संपत्तीच्या वादातून सख्ख्या मेव्हण्याला मारण्यासाठी पैलवानांना सुपारी, आपटे रोडवर तरुणावर हल्ला

संपत्तीच्या वादातून सख्ख्या मेव्हण्याला मारण्यासाठी पैलवानांना सुपारी, आपटे रोडवर तरुणावर हल्ला

पुणे : संपत्तीच्या वादातून सख्या मेव्हण्याला मारण्यासाठी मध्य प्रदेशातील पैलवानाला सुपारी देण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे. महेश महादेव ठोंबरे (वय २८, रा. संगमवाडी, सध्या रा. आगरवाल तालीम, कसबा पेठ) आणि अश्विनीकुमार शेषराव पाटील (वय ५२, रा. कमलनिवास, आपटे रस्ता) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत एका ३१ वर्षाच्या तरुणाने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या तरुणाचे आपटे रोडवर हॉटेल आहे. हा तरुण ४ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हॉटेल बंद करुन घरी जात होता. त्यावेळी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दोघे जण तरुणाच्या जवळ आले. त्यांनी त्याच्या तोंडावर तिखट टाकून हत्याराने वार केले. यात हा तरुण गंभीर जखमी झाला होता. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता.

गुन्हे शाखेच्या युनिट एककडून याचा समांतर तपास केला जात होता. पोलिसांनी घटनास्थळापासून बालगंधर्व रंगमंदिर, वृद्धेश्वर घाट गाडीतळ चौक, मालधक्का चौक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यात संशयित आरोपी पुणे स्टेशनकडे गेल्याचे दिसून आले. पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासात महेश ठोंबरे याचे नाव समोर आले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर फिर्यादीचे दाजी अश्विनीकुमार शेषराव पाटील यांच्या सांगण्यावरुन ५० हजार रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे समोर आले. मध्यप्रदेशातील पैलवान फैजल खान व त्याच्या दोन मित्रांना फिर्यादीवर हल्ला करण्यासाठी सुपारी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाटील याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक पोलिस निरीक्षक अशिष कवठेकर, पोलिस अंमलदार दता सोनावणे, महेश बामगुडे, शुभम देसाई, निलेश साबळे, राहुल मखरे, शशीकांत दरेकर, आय्याज दड्डीकर, अभिनव लडकत यांनी केली आहे.

Web Title: Betel nut to wrestlers to kill brother-in-law due to property dispute, youth attacked on Apte Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.