विश्वासघाताने आम्ही विरोधक झालो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:09 AM2021-04-26T04:09:50+5:302021-04-26T04:09:50+5:30

पिंपरी : महाराष्ट्रात भाजपचा सत्ता न आल्याबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा सल व्यक्त केली. ‘जनतेने आम्हाला राज्यकर्ते ...

Betrayed, we became opponents | विश्वासघाताने आम्ही विरोधक झालो

विश्वासघाताने आम्ही विरोधक झालो

Next

पिंपरी : महाराष्ट्रात भाजपचा सत्ता न आल्याबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा सल व्यक्त केली. ‘जनतेने आम्हाला राज्यकर्ते म्हणून निवडून दिलं. पण विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधक झालो, अशी खंत व्यक्त केली.

महापालिकेच्या कोविड सेंटरला पाटील यांनी भेट दिली. या वेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, कोविडचा काळ आहे. कोरोनाचं प्रमाण वाढत आहे. रेमडेसिवीरचा विषय आता नियंत्रणात आहे. ऑक्सिजनचा विषयही नियंत्रणात येत आहे. या वातावरणात राजकारण करणं योग्य नाही. मात्र, कोविड आहे काय हवं ते करून घ्या, असंही करून चालणार नाही. शेवटी लोकांनी तुम्हाला अंकुश शक्ती म्हणून निवडून दिलं आहे. आम्हाला राज्यकर्ते म्हणूनच निवडून दिलं होतं. विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधक झालो.

---

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावरील छापे हा सीबीआयचा दुरुपयोग नाही का? या प्रश्नावर पाटील म्हणाले, ‘न्यायालयानेच या प्रकरणाची चौकशी लावली आहे. कोर्टाने केवळ चौकशीचे आदेश दिल्याचं सांगितलं जात आहे. माझ्याकडे ऑर्डर आहे. त्यात शेवटच्या ओळीत एफआयआर दाखल करण्याचे निर्देश आहेत. यात सत्तेचा दुरुपयोग आला कुठे?’

---

बंगाल, पंढरपूर जिंकणार

पाटील म्हणाले, ‘सर्वोच्च न्यायालयाने मोदींना फटकारले की बघा कोर्टाने केंद्राला फटकारले, असं संजय राऊत सांगतात, पण महाराष्ट्राला फटकारले की ते मॅनेज असल्याचा आरोप करतात.’ पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक जागा मिळणार आणि पंढरपूर जिंकणार. आमचा विजय झाला की ईव्हीएम घोटाळा असतो. त्यांचा विजय झाला की सारं काही ‘ऑल इज वेल’ असतं.’’

Web Title: Betrayed, we became opponents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.