दररोज भांडण्यापेक्षा 'मनातलं बोलून' वेगळं झालेलं बरं..

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 12:43 PM2020-09-07T12:43:10+5:302020-09-07T12:44:46+5:30

ऑगस्ट 2018 ते ऑगस्ट 2020 पर्यत कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यासाठी तीन हजार 152 अर्ज दाखल झाले आहेत.

Better to quarrrel we are seprate from relationship | दररोज भांडण्यापेक्षा 'मनातलं बोलून' वेगळं झालेलं बरं..

दररोज भांडण्यापेक्षा 'मनातलं बोलून' वेगळं झालेलं बरं..

Next
ठळक मुद्देपरस्पर संमतीने घटस्फोट घेणाऱ्याची संख्या सर्वाधिक

युगंधर ताजणे- 

पिंपरी : दिवस रात्र त्यांच्यात चाललेली भांडणे घरातल्या सगळ्यांना नकोशी झालेली, उच्चशिक्षित असून, दोघांना भरभक्कम पगार असताना छोट्यामोठ्या कारणाने वादाला सुरुवात व्हायची, यातून एकमेकांना मानसिक त्रास व्हायचा. कितीही प्रयत्न केला तरीही नाते पून्हा रुळावर येणार नाही असे कळल्यानंतर मात्र 'मनातलं बोलून' वेगळं झालेलं बरं असा विचार करून वेगळं होण्याचा निर्णय अनेक जोडप्यांनी घेतला आहे. परस्पर संमतीने घटस्फोट घेऊन नवीन वाट निवडणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. 

ऑगस्ट 2018 ते ऑगस्ट 2020 पर्यत कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यासाठी तीन हजार 152 अर्ज दाखल झाले आहेत. तर या काळात संमतीने विभक्त होण्याचे एक हजार 912 दावे निकाली निघाले आहेत. एकतर्फी घटस्फोट, नांदवयास येण्यासाठी आणि विवाह रद्द बातल करण्यासाठी 1 जानेवारी 2018 ते 31 ऑगस्टअखेरीस चार हजार 273 अर्ज आले आहेत. या कालावधीत याबाबतचे 3 हजार 484 अर्जांवर निकाल देण्यात आला आहे. 
परस्पर संमतीने घटस्फोट घेणाऱ्याची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येते. यामागील कारण सांगायचे झाल्यास यापूर्वी मेडीएशनचे अनेक कार्यक्रम घेण्यात आले. त्यातून तडजोडीचे महत्व जोडप्यांना समजावून सांगण्यात आले. पैसा, वेळ याची यातून बचत होणार असल्याचे त्यांना पटवून देण्यात आले. यामुळे अनेकांचे संसार जुळून आले तर काहींनी संमतीने विभक्त होण्यास पसंती दिली. कोरोनाच्या संसर्गामुळे उदभवलेल्या परिस्थितीचा फटका अनेक जोडप्यांना बसला आहे. यात प्रामुख्याने आर्थिक अडचण, पगार - नोकरी कपात ही कारणे घटस्फोट घेण्यामागे असल्याचे कौटुंबिक न्यायालयात काम करणाऱ्या वकिल व समुपदेशक यांनी सांगितले. 

* आयटीयन्सची संख्या सर्वाधिक, वयोगट 30 च्या पुढे 
एकमेकांच्या संमतीने काडीमोड घेण्याचे दावे दाखल करण्यात सर्वाधिक संख्या आयटीयन्सची आहे. उच्चशिक्षित कुटुंबे, भरपूर पगार, आणि यामुळे वाढत चाललेली अहंपणाची भावना याचा परिणाम नात्यावर झालेला दिसून येत आहे. एकमेकांना जास्त समजून घेण्यापेक्षा झटपट नाते तोडून पुन्हा दुसरे नाते जोडण्यावर त्यांचा अधिक भर असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय घरच्या व्यक्तींचा नको तितका हस्तक्षेप नवरा बायकोच्या संसारात असल्याने त्याचा परिणाम नात्यावर होतो. मात्र वाद किंवा भांडणात या गोष्टी लक्षात येत नसल्याचे द फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. वैशाली चांदणे यांनी सांगितले. 


* 'म्युच्युअली घटस्फोट घेण्याचे कारण काय ? 
- एकमेकांची बदनामी होत नाही, संमतीने पुन्हा नवीन मार्ग निवडता येतो. 
-आपल्या भांडणाचा परिणाम मुलांवर होऊ द्यायचा नाही. असा विचार करून घटस्फोटाचा निर्णय घेणे
- शारीरिक व मानसिक त्रास कमी होण्यासाठी
- मर्जीने अर्ज केल्याने द्वेष भावना निर्माण होत नाही
- वेळ व पैसा वाचतो व कमी वेळा न्यायाला जावे लागते
- घटस्फोटाची प्रक्रिया लवकर होते

Web Title: Better to quarrrel we are seprate from relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.