बारामतीकरांनो सावधान; कचरा केल्यास होणार दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:27 AM2020-12-14T04:27:01+5:302020-12-14T04:27:01+5:30

या मोहिमेतर्गंत शहरातत नागरिकांना घरासमोर व व्यापारी आस्थापनांना आपल्या दुकानासमोर दोन कचरा पेट्या ठेवण्यासाठी सक्ती करण्यात आली आहे. या ...

Beware of Baramatikars; Punitive action will be taken for littering | बारामतीकरांनो सावधान; कचरा केल्यास होणार दंडात्मक कारवाई

बारामतीकरांनो सावधान; कचरा केल्यास होणार दंडात्मक कारवाई

Next

या मोहिमेतर्गंत शहरातत नागरिकांना घरासमोर व व्यापारी आस्थापनांना आपल्या दुकानासमोर दोन कचरा पेट्या ठेवण्यासाठी सक्ती करण्यात आली आहे. या महिन्यात सर्वांना सूचना करण्यात आली आहे. मात्र जानेवारी महिन्यात जर दोन कचरापेट्या ठेवल्या नाही, अथवा उघड्यावर कचरा टाकल्यास दंड करण्यात येणार आहे. केंद्राच्या स्वच्छ अभियानाच्या बारामती शहर आणण्यासाठी नगरपालिकेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नोव्हेंबरपासूनच स्वच्छता मोहीम वेगात सुरू करण्यात आली आहे.

यामध्ये नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग व्हावा यासाठी जनजागृतीवर भर दिला जात आहे. शहरात सध्या ६० टक्के कचरा वर्गीकरण करण्यात येत आहेत. उर्वरित ४० टक्के नागरिकांमध्ये डिसेंबरमध्ये जनजागृती केली जाईल. जानेवारीपर्यंत शंभर टक्के कचरा वर्गीकरण झाले पाहिजे यावर भर दिला जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार निर्मितीच्या जागी कचरा

विलगीकरण करण्याची जबाबदारी ही संबधित कचरा निर्माण करणाºया संस्था अथवा व्यक्तींची असल्याचे आरोग्य निरीक्षक सुभाष नारखेडे यांनी सांगितले आहे.

स्वच्छता मोहीमेते स्वरूप

- कचरा वर्गीकरण करण्यास प्राधान्य

- सर्व वॉर्डांत जनजागृती केली जाणार

- ओला व सुका कचरा वर्गीकरणाचे महत्त्व नागरिकांना व व्यापाऱ्यांना पटवून दिले जाणार

- चार प्रकारांत वर्गीकरण करण्यावरही भर

- सर्व प्रकारच्या घरगुती कचऱ्याचे वर्गीकरण निश्चिती

- वर्गीकरण न केल्यास कचरा स्वीकारला जाणार नाही

- सांडपाणी प्रकल्पावर लक्ष केंद्रीत करणे

असा आकारणार दंड (रूपयांमध्ये)

रस्त्यांवर कचरा टाकल्यास -१८०

कचरा वर्गीकरण न केल्यास -२००

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे - १५०

उघड्यावर लघुशंका करणे- २००

उघड्यावर शौच करणे - ५००

दंड आकरण्यात येणार आहे.

अस्वच्छतेमुळे शहरात वेगवेगळ्या आजारांच्या साथी पसरतात. अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

- किरणराज यादव, मुख्याधिकारी, बारामती नगरपालिका

Web Title: Beware of Baramatikars; Punitive action will be taken for littering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.