सावधान! देशातील 'या' २१ विदयापीठात घेऊ नका प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 08:59 PM2022-08-26T20:59:59+5:302022-08-26T21:00:26+5:30

महाराष्ट्रातील नागपुरातील राजा अरेबिक युनिव्हर्सिटी या विदयापीठाचा समावेश

Beware Do not take admission in 21 university in the country | सावधान! देशातील 'या' २१ विदयापीठात घेऊ नका प्रवेश

सावधान! देशातील 'या' २१ विदयापीठात घेऊ नका प्रवेश

googlenewsNext

पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील मान्यता नसलेल्या विद्यापीठांची यादी जाहीर केली असून देशभरात 21 बोगस विद्यापीठं आढळली आहेत. यामध्ये मान्यता नसलेले सर्वाधिक विद्यापीठे दिल्लीत असून महाराष्ट्रातील नागपुरातील राजा अरेबिक युनिव्हर्सिटी या विदयापीठाचा समावेश आहे. या स्वयंघाेषित व युजीसीची मान्यता नसलेल्या विदयापीठात प्रवेश घेउ नका असे अवाहन करण्यात आले आहे.

यूजीसीने जाहीर केलेल्या यादीनुसार दिल्लीमध्ये आठ, उत्तर प्रदेशमधे चार, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी दोन तर महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि पुदुच्चेरीमध्ये प्रत्येक एक असे एकुण २१ बोगस विद्यापीठ असल्याचे व त्यांना पदवी प्रदान करण्याचा अधिकार नसल्याचे यूजीसीचे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी स्पष्ट केले आहे. गेल्यावर्षीच्या यादीमध्ये अशी 24 बोगस विद्यापीठे होती. यावर्षी २१ आहेत.

विदयापीठ म्हणजे काय रे भाउ?

विद्यापीठ कायद्यानुसार स्थापन झालेल्या केंद्रीय, राज्य आणि अभिमत विद्यापीठांना किंवा संसदेने पारित केलेल्या कायद्यानुसार संस्थांनाच पदवी प्रदान करण्याचा अधिकार आहे. अन्य संस्थांना नावात विद्यापीठ हा शब्द वापरता येत नाही.

या विदयापीठांना नाही मान्यता


महाराष्ट्र

- राजा अरेबिक युनिव्हर्सिटी, नागपूर

दिल्ली

- ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ पब्लिक अॅण्ड फिजीकल हेल्थ सायन्सेस
-कमर्शियल युनिव्हर्सिटी लिमिटेड, दरिया गंज
-युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी
-व्होकेशनल युनिव्हर्सिटी
-ए.डी.आर.- सेन्ट्रिक जुरीडीकल युनिव्हर्सिटी
-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अॅण्ड इंजिनियरिंग
-विश्वकर्मा ओपन युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट
- आध्यात्मिक विश्वविद्यालय

ओडिसा

- नव भारत शिक्षा परिषद, रूरकेला
- नॉर्थ ओडिसा युनिव्हर्सिटी ऑफ अॅग्रिकल्चर अॅण्ड टेक्नोलॉजी, मयूरभंज

पुद्दुचेरी

- श्री बोधि अॅकेडमी ऑफ हायर एज्युकेशन, थीलासपेट

आंध्र प्रदेश

- क्राइस्ट न्यू टेस्टामेंट डीम्ड युनिव्हर्सिटी, गुंटूर

कर्नाटक

- बडागानवी सरकार वर्ल्ड ओपन युनिव्हर्सिटी एज्युकेशन सोसायटी

केरळ

- सेंट जॉन युनिव्हर्सिटी कृष्णाटम

पश्चिम बंगाल

- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन, कोलकाता
- इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन अॅण्ड रिसर्च, कोलकाता

उत्तर प्रदेश

- गांधी हिंदी विद्यापीठ, प्रयाग
- नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स होमिओपॅथी, कानपूर
- नेताजी सुभाषचंद्र बोस ओपन युनिव्हर्सिटी, अलिगढ
- भारतीय शिक्षा परिषद , लखनऊ

Web Title: Beware Do not take admission in 21 university in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.