सावधान, कोरोनाबधितांचा आलेख वाढताच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:10 AM2021-03-20T04:10:02+5:302021-03-20T04:10:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात कोरोनाबाधितांचा आलेख दिवसागणिक वाढतच चालला असून, शुक्रवारी नव्याने २ हजार ८३४ रुग्णांची भर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात कोरोनाबाधितांचा आलेख दिवसागणिक वाढतच चालला असून, शुक्रवारी नव्याने २ हजार ८३४ रुग्णांची भर पडली आहे़ गुरुवारच्या (१८ मार्च) तुलनेत ही रुग्णवाढ शंभरहून अधिक आहे़ त्यामुळे शहरातील वाढणारी रुग्णसंख्या थोपविणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे़
पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात १२ हजार ६२५ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही २२़ ४४ टक्के इतकी आहे़ शहरातील सक्रिय रुग्ण संख्याही वाढली असून, आजमितीला शहरात १८ हजार ८८८ सक्रिय रुग्ण आहेत़ सध्या शहरात ४९९ गंभीर कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असून, ८८४ रुग्णांवर आॅक्सिजनसह उपचार चालू आहेत़ आज दिवसभरात ८०८ जण कोरोनामुक्त झाल्याचीही नोंद घेण्यात आली आहे़ दरम्यान आज दिवसभरात २८ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १३ जण हे पुण्याबाहेरील आहेत़
शहरात आजपर्यंत १२ लाख ९९ हजार ३८६ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ लाख २९ हजार ३८३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी २ लाख ५ हजार ४७८ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ५ हजार १७ इतकी झाली आहे़
==========================