सावधान !! ताे व्हाॅट्सअॅप मेसेज तुमची वैयक्तिक माहिती चाेरण्यासाठी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 06:04 PM2018-11-15T18:04:20+5:302018-11-15T18:06:48+5:30
सध्या अॅमेझाॅन या नामांकित वस्तू विक्रीच्या वेबसाईट्च्या नावे व्हाट्स अॅपवर एक खाेट्या अाॅफरचा मेसेज फिरत असून त्यात दिलेल्या लिंकवर क्लिक करुन अापली माहिती भरल्याने ती माहिती चाेरीला जाण्याची शक्यता अाहे.
पुणे : सध्या अाॅनलाईनचं युग असल्याने घरातील सामानापासून ते विमानाच्या तिकीटापर्यंत सर्व गाेष्टी अाॅनलाईन बुक केल्या जात अाहेत. हजाराे वेबसाईट्स तसेच अॅपच्या माध्यमातून माहितीची देवाण घेवाण केली जात अाहे. अाॅनलाईनचा वापर जरी वाढला असला तरी फसवणुकीचे धाेके सुद्धा शेकडाे पटींनी वाढले अाहेत. सध्या अॅमेझाॅन या नामांकित वस्तू विक्रीच्या वेबसाईट्च्या नावे व्हाट्स अॅपवर एक खाेट्या अाॅफरचा मेसेज फिरत असून त्यात दिलेल्या लिंकवर क्लिक करुन अापली माहिती भरल्याने ती माहिती चाेरीला जाण्याची शक्यता अाहे. त्यामुळे नागरिकांची अार्थिक फसवणूक हाेण्याची शक्यता निर्माण झाली अाहे.
गेल्या काही दिवसांपासून अॅमेझाॅन या नामांकित वेबसाईटच्या नावाने अॅमेझाॅन की सबसे बडी सेल अशा शिर्षकाचा एक मेसेज व्हाॅट्सअॅपवर फिरत अाहे. त्यात कॅनाॅन चा कॅमेरा केवळ 199 रुपये, व्हिवाे कंपनीचा माेबाईल 1799 रुपये, अॅपल कंपनीचे घड्याळ केवळ 11 रुपयांना तर जेबिएलचे स्पिकअर हे 117 रुपयांना असल्याचे म्हंटले अाहे. या मेसेजच्या खाली एक लिंक देण्यात अाली अाहे. त्या लिंकवर क्लिक करुन अाॅर्डर करण्याचे अावाहन करण्यात अाले अाहे. त्याचबराेबर फ्रि डिलिव्हरी अाणि वस्तू मिळाल्यावर पैसे भरण्याची साेय असल्याचेही यात म्हणण्यात अाले अाहे. हा मेसेज खाेटा असल्याचे सायबर तज्ञांचे म्हणणे अाहे. अॅमेझाॅनचे नाव वापरुन खाेटी वेबसाईट तयार करुन नागरिकांची माहिती चाेरण्यात येत अाहे. हा मेसेज खरा समजून नागरिक वस्तू अाॅर्डर करीत अाहेत. परंतु यामुळे नागरिकांची वैयक्तिक माहिती चाेरीला जाण्याची शक्यता निर्माण झाली अाहे.
याबबात बाेलताना सायबर तज्ञ जय गायकवाड म्हणाले, अॅमेझाॅनच्या नावाने खाेटी वेबसाईट तयार करुन ग्राहकांची माहिती चाेरण्यात येत अाहे. ही खाेटी वेबसाईट दाेन दिवसांपूर्वी तयार करण्यात अाली अाहे. व्हाॅट्स अॅपवर सध्या फिरत असलेला मेसेज खाेटा असून नागरिकांची वैयक्तिक माहिती चाेरण्यासाठी ताे तयार करण्यात अाला अाहे. त्या मेसेजमध्ये देण्यात अालेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर अॅमेझाॅन वेबसाईटचे नाव असलेले खाेटे पेज येते. वस्तू खरेदी करण्यासाठी तुम्हाला लाॅगिन करण्यास सांगण्यात येते. तुम्ही लाॅगिन केल्यानंतर तुमचा अायडी अाणि पासवर्ड हॅकर्स चाेरी करतात. त्याचा वापर करुन ते अॅमेझाॅनच्या खऱ्या वेबसाईटवरुन खरेदी करु शकतात. तसेच तुमच्या डेबिट कार्ड तसेच क्रेडिट कार्डची माहिती सुद्दा चाेरु शकतात. त्यामुळे नागरिकांनी अशा मेसेजची खात्री केल्याशिवाय अापली वैयक्तिक माहिती देऊ नये.