भोरला टंचाईग्रस्त गावांची थट्टा!

By admin | Published: May 30, 2017 02:15 AM2017-05-30T02:15:41+5:302017-05-30T02:15:41+5:30

पावसाळा सुरू होत आला तरी पंचायत समितीत टंचाई कक्षच नाही. प्रभारी उपअभियंताही आठवड्यातून एकदाच फक्त मंगळवारीच हजर

Bhaala scarcity-hit villages joke! | भोरला टंचाईग्रस्त गावांची थट्टा!

भोरला टंचाईग्रस्त गावांची थट्टा!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भोर : पावसाळा सुरू होत आला  तरी पंचायत समितीत टंचाई कक्षच नाही. प्रभारी उपअभियंताही आठवड्यातून एकदाच फक्त मंगळवारीच हजर असतात. त्यामुळे तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांनी आपली व्यथा मांडायची तरी कुठे व कोणाकडे, असा संतप्त सवाल आता ग्रामस्थ करीत आहेत. टँकरबाबत आमची थट्टा सुरू असल्याची व्यथा ते मांडत आहेत.
ग्रामीण पाणीपुरवठा विभाग म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी आवस्था झाली आहे.
तालुक्यातील भाटघर व नीरादेवघर धरणातील पाणीसाठी अत्यल्प झाल्याने १० गावे आणि १३ वाड्यांनी टँकर मागणीचे प्रस्ताव भोर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागात सादर केले आहेत. त्यापैकी ३ टँकर व २ पिकअप जीप मंजूर करून टंचाईग्रस्त गावातील लोकांची बोळवण केली आहे.
टंचाईबाबत ग्रामस्थ पाणीपुरवठा विभागात आल्यास प्रभारी उपअभियंता आठवड्यातून एकदाच येत असल्यामुळे त्यांचे दर्शनच होत नाही तर शाखा अभियंता फिरतीवर असल्याचे सांगितले जाते. यामुळे येथील एखाद्या लिपिकाशी बोलून सरपंच, ग्रामस्थ किंवा ग्रामसेवकाला घरचा रस्ता धरावा लागतो.
मंगळवारशिवाय पाणीपुरवठा विभागातील कोणताच अधिकारी भेटत नाही. शिवाय पुण्याला मीटिंग असली तरी तेही शक्य होत नसल्याचे भगवान कंक यांनी सांगितले.
अनेक गावातील टंचाई, एकात्मिकसाठी व नवीन योजना करण्यासाठी अंदाजपत्रकासाठी सहा-सहा महिने वारंवार हेलपाटे मारावे लागतात.
तर काम झाल्यावर एम. टी (मूल्यांकन) करण्यासाठी येथील शाखा अभियंता ढाब्यावर जेवण व आर्थिक तरतूद प्रथम केल्यावरही वारंवार हेलपाटे मारुन वेळवर एम. बी. मिळतच नाही.
सहा सहा महिने पैसे काढता येत नसल्याने अनेक पाणीपुरवठा योजना तीन ते चार वर्षे होऊनही पूर्ण झालेल्या नाहीत. त्याचाही परिणाम टंचाईवर होत आहे.

संबंधित शाखा अभियंत्यांकडून कामे वेळेवर होत नसल्याने ठेकेदार व सरपंच यांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे सरपंच सांगतात. येथील काही शाखा अभियतंत्यांना अनेक वर्षे झाल्याने ते सरपंच नागरिक व ग्रामसेवकांची पिळवणूक करीत आहेत. त्यांच्यावर प्रभारी उपअभियंत्यांचा अंकुश नाही. त्यामुळे त्यांची बदली करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Bhaala scarcity-hit villages joke!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.