भगवानदास सुगंधी-दर्डा यांचे कार्य पोहोचले वर्ल्ड वाईल्ड बुक रेकॉर्डमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 11:20 AM2023-10-08T11:20:06+5:302023-10-08T11:20:21+5:30
भगवानदास सुगंधी- दर्डा यांनी या वयात २४ रजिस्टर स्वत:च्या हाताने लिहून पूर्ण केली. त्यामध्ये जैन धर्माचे मंत्र, भगवद्-गीता, परमेश्वराचे नाव आदी लिखाण आहे. याच लेखनाची दखल वर्ल्ड वाईल्ड बुक रेकॉर्डने घेतली.
पुणे : वयाच्या ८५ व्या वर्षी २४ रजिस्टरमध्ये तब्बल ७६ लाख शब्द स्वतःच्या हाताने लिहिणारे भगवानदास चुनीलाल सुगंधी-दर्डा यांचे नाव वर्ल्ड वाईल्ड बुक रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. ज्या वयात लिहिताना हात थरथर कापतो, त्या वयात अतिशय सुंदर हस्ताक्षर काढून दर्डा यांनी ही किमया करून दाखवली आहे.
भगवानदास सुगंधी- दर्डा यांनी या वयात २४ रजिस्टर स्वत:च्या हाताने लिहून पूर्ण केली. त्यामध्ये जैन धर्माचे मंत्र, भगवद्-गीता, परमेश्वराचे नाव आदी लिखाण आहे. याच लेखनाची दखल वर्ल्ड वाईल्ड बुक रेकॉर्डने घेतली.
भगवानदास सुगंधी यांचा ११० वर्षे जुना अगरबत्तीचा व्यवसाय आहे. त्यांनी पाच वर्षांपूर्वीपासून भगवदगीता, जैन धर्माचे मंत्र लिहिण्यास सुरवात केली. त्यामुळे आतापर्यंत २८ मोठे रजिस्टर स्वहस्तलिखितामध्ये पूर्ण केले आहेत. या रजिस्टरमध्ये एकूण ७६ लाख १० हजार ८४० शब्द आहेत. तर ३२ लाख ५८ हजार ३२५ वाक्य आहेत. एकूण लिखित पाणे ७ हजार ४९ झाली आहेत.
पुणेकरानी केला सत्कार
वयाच्या ८५ व्या वर्षी हे कार्य करणे अद्भूत आहे. त्याची दखल घेत खास कोकणस्थ परिवार, पुणेच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाचे निवृत्त क्रीडा संचालक प्राध्यापक शाम करंदीकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यस्थानी सुनील नेवरेकर होते. रमेश मोगरे यांनी स्वागत केले. विश्वजित घुले यांनी प्रास्तविक केले.
- व्यवसायात यशस्वी झाल्यानंतर भगवानदास सुगंधी-दर्डा यांना आध्यात्मिक ओढ लागली. व्यवसायाचे काम संपल्यानंतर रात्री घरी आल्यावर जैन धर्माचे मंत्र लिहिण्याचे काम सुरू केले.