ग्रामीण विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे भैरवनाथ महाविद्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:11 AM2021-03-01T04:11:03+5:302021-03-01T04:11:03+5:30
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या प्रगतीच्या दृष्टीनं प्रेरणा देणारी आणि अभिनव उपक्रम आयोजित करणारी महाविद्यालयं जवळ केली पाहिजेत. खुटबाव ...
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या प्रगतीच्या दृष्टीनं प्रेरणा देणारी आणि अभिनव उपक्रम आयोजित करणारी महाविद्यालयं जवळ केली पाहिजेत. खुटबाव इथलं भैरवनाथ विज्ञान महाविद्यालय हे त्यापैकी एक आहे, हे सांगताना मला आनंद आणि अभिमान वाटतो,’’असे उद्गार नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजीमहाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. एस. एन. पठाण ह्यांनी काढले.
ते येथील भैरवनाथ शिक्षण मंडळाच्या भैरवनाथ विज्ञान महाविद्यालयाने मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या ऑनलाईन लोकसाहित्य संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आविनाश सांगोलेकर हे होते. उद्घाटक म्हणून मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. बी. एन. गायकवाड हे उपस्थित होते.
प्रारंभी महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे साहाय्यक प्राध्यापक धनंजय भिसे ह्यांनी स्वागत केले. महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक सा.प्रा.अनिल सोनवणे आणि अर्थशास्त्र विषयाच्या साहाय्यक प्राध्यापक अक्षता थोरात ह्यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. भैरवनाथ शिक्षण मंडळाचे सहसचिव सूर्यकांत खैरे ह्यांनी शुभेच्छा दिल्या.
आगळ्यावेगळ्या अशा ह्या ऑनलाईन लोकसाहित्य संमेलनात २० हून अधिक विद्यार्थी - विद्यार्थिनींनी , तसेच निवडक शिक्षकांनी म्हणी, वाक्प्रचार, उखाणी, जात्यावरील ओव्या, तसेच स्त्रीगीते सादर करून आपला सहभाग नोंदवला. वाणिज्य शाखाप्रमुख सा. प्रा. डॉ. मनीषा सोडनवर ह्यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा.प्रियांका कुऱ्हाडे ह्यांनी केले.
मराठी राजभाषादिनानिमित्त बोलताना डॉ. एस. एन. पठाण