भैरवनाथांचा मुखवटा चोरीस
By admin | Published: May 26, 2017 05:46 AM2017-05-26T05:46:34+5:302017-05-26T05:46:34+5:30
येथील ग्रामदैवत महालक्ष्मी मंदिराचे कुलूप चोरट्यांनी तोडून २५० वर्षांपूर्वीचा भैरवनाथदेवाचा दीड किलोचा पंचधातूचा मुखवटा व महालक्ष्मी देवीच्या अंगावरील बेन्टेक्सचे दागिने लांबविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
दावडी : येथील ग्रामदैवत महालक्ष्मी मंदिराचे कुलूप चोरट्यांनी तोडून २५० वर्षांपूर्वीचा भैरवनाथदेवाचा दीड किलोचा पंचधातूचा मुखवटा व महालक्ष्मी देवीच्या अंगावरील बेन्टेक्सचे दागिने लांबविले.
याबाबत खेड पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, येथे तळ्याकाठी महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे. गुरुवारी (दि. २५) पहाटे चोरट्यांनी देवीसमोरील मंडपाच्या दरवाजाचे टिकावाने कुलूप तोडून आत प्रवेश केला. उत्तरेचा हा दरवाजा पळून जाण्यासाठी तोडून ठेवला. देवीच्या गाभाऱ्याचा मुख्य सागवानी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. देवीशेजारी ठेवलेला अंदाजे दीड किलोचा २५० वर्षांपूर्वीचा भैरवनाथदेवाचा पंचधातूचा मुखवटा अंदाजे किंमत ४० हजार रुपये व देवीच्या अंगावरील सोने समजुन बेन्टेक्सचे दागिने लांबविले.