भैरवनाथाची पालखी रद्द, स्नान उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:15 AM2021-09-07T04:15:11+5:302021-09-07T04:15:11+5:30

वाल्हे : वर्षातून दोन वेळा येणाऱ्या सोमवती अमावस्येला वाल्हे येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची मूर्ती पालखीतून वाजत-गाजत ग्राम प्रदक्षणा घालत ...

Bhairavnath's palanquin canceled, bath in excitement | भैरवनाथाची पालखी रद्द, स्नान उत्साहात

भैरवनाथाची पालखी रद्द, स्नान उत्साहात

googlenewsNext

वाल्हे : वर्षातून दोन वेळा येणाऱ्या सोमवती अमावस्येला वाल्हे येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची मूर्ती पालखीतून वाजत-गाजत ग्राम प्रदक्षणा घालत नीर नदीवर स्नानासाठी नेले जाते. यंदा कोरोनाच्या निर्बंधांमुळे मोटारीतून पालखी थेट नदीवर नेऊन मुर्तीला स्नान घालण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा उत्सव मिरवणूक बंद असली तरीसुध्दा स्नानाच्या विधी बंद करण्यात आल्या नाहीत. शिवाय भाविकांची गर्दी नसली तरी प्रत्यक्ष स्नानाच्या विधीवेळी उपस्थित मोजक्या भाविकांचा उत्साह तितकाच शिगेला पोहोचविणारा होता. त्यानुसार आज वाल्हे येथील भैरवनाथ व आडाचीवाडी येथील काळभैरव त्याचबरोबर मदने वस्ती मसनेर देवाच्या पालख्या व टेम्पोमधून वीर येथील घोडे उड्डाण येथे नीरा नदीवर विविध ठिकाणी नेऊन मूर्तीला स्नान घालण्यात आले.

यावेळी मूर्तीची पूजा पुजारी आगलावे यांच्या हस्ते करून आरती घेण्यात आली. यावेळी ठराविक मानकरीच उपस्थीत होते.

Web Title: Bhairavnath's palanquin canceled, bath in excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.