Bhaiyyuji Maharaj suicide : दौैंडला भय्यूजी महाराज तीन वेळा वास्तव्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 02:08 AM2018-06-13T02:08:55+5:302018-06-13T02:08:55+5:30
दौैंड शहरात भय्यूजी महाराज यांचे गेल्या १० ते १५ वर्षांच्या कालावधीत ३ वेळा वास्तव्य होते. दौैंडचे माजी आमदार बाळासाहेब जगदाळे-पाटील, माजी आमदार उषादेवी जगदाळे-पाटील, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे आणि नगरसेवक इंद्रजित जगदाळे यांचे भय्यूजी महाराज जवळचे नातेवाईक होते.
दौैंड - दौैंड शहरात भय्यूजी महाराज यांचे गेल्या १० ते १५ वर्षांच्या कालावधीत ३ वेळा वास्तव्य होते. दौैंडचे माजी आमदार बाळासाहेब जगदाळे-पाटील, माजी आमदार उषादेवी जगदाळे-पाटील, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे आणि नगरसेवक इंद्रजित जगदाळे यांचे भय्यूजी महाराज जवळचे नातेवाईक होते.
त्यामुळे महाराजांचा काही काळ शहरातील राजकीय, सामाजिक आणि व्यापारी मंडळींशी संपर्क आला होता. त्यांच्या आठवणी सांगताना जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे म्हणाले, की साधे सरळ आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वाचे भय्यूजी महाराज होते. ते त्यांच्या सहवासात आलेल्या लोकांना नेहमीच चांगल्या संस्काराचे मार्गदर्शन करीत. २००६मध्ये ते शहरात पहिल्यांदा आले, त्या वेळी त्यांनी शहरातील काही व्यापारी आणि राजकीय व्यक्तींबरोबर संवाद साधला होता. २००७मध्ये जगदाळे यांच्यासमवेत ते यवत (ता. दौंड) परिसरातील भुलेश्वरला गेले होते. या वेळी त्यांनी भुलेश्वराला अभिषेक केला. अहमदनगरहून फलटणला जात असताना ते दौैंड शहरात आले होते. एकंदरीतच, दौैंडच्या तिन्ही भेटींत गावचे पाटील तथा माजी आमदार बाळासाहेब जगदाळे-पाटील यांच्या वाड्यावर भय्यूजी महाराज आले होते.