भामा आसखेड धरण १०० टक्के भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 19:08 IST2018-09-03T19:06:40+5:302018-09-03T19:08:09+5:30
खेड तालुक्यासह इतर तालुक्यांना वरदान ठरलेले भामा आसखेड धरण शंभर टक्के भरले असून धरणाच्या एक आणि चार क्रमांकाच्या दरवाजातून सोमवारी (दि. ३) ५५३ क्यूसेसने पाणी सोडण्यात आले आहे.

भामा आसखेड धरण १०० टक्के भरले
आंबेठाण : खेड तालुक्यासह इतर तालुक्यांना वरदान ठरलेले भामा आसखेड धरण शंभर टक्के भरले असून धरणाच्या एक आणि चार क्रमांकाच्या दरवाजातून सोमवारी (दि. ३) ५५३ क्यूसेसने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सावधानता बाळगावी असे आवाहन धरण प्रशासनाचे अधिकारी भारत बेंद्रे यांनी केले आहे.
भामा आसखेड हे खेड तालुक्यात भामा नदीवर उभारलेले मातीचे ८.१४ टी एम सी चे धरण आहे.भामा आसखेड धरण क्षेत्रात आणि तालुक्याच्या पश्चिम भागात मागील काही दिवसांपासून पाऊस सुरू होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून धरणाच्या एक आणि चार क्रमांकाच्या दरवाजातून ५५३ क्यूसेस वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे.एक जून पासून धरण क्षेत्रात ७१७ मिली पावसाची नोंद झाली आहे. धरणात २६ जून पासून पाणी जमा होण्यास सुरुवात झाली. भामा आसखेड हे खेड तालुक्याच्या पश्चिम भागात भामा नदीवर उभारलेले मातीचे धरण आहे. सोमवारी जरी ५५३ क्यूसेसने पाणी सोडण्यात आले असले तरी भविष्यात पावसाचे प्रमाण जास्त झाले तर विसर्ग अजून वाढवावा लागेल. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी आणि विशेषत: शेतकरी बांधवांनी सावधानता बाळगावी असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.