पुणे शहराच्या पूर्व भागातील भामा आसखेडचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ पाणीपुरवठ्यासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2020 02:01 PM2020-12-03T14:01:36+5:302020-12-03T14:32:58+5:30

पुणे शहराचा पूर्व भाग म्हणजे लोहगाव, कळस, धानोरी, वडगावशेरी, खराडी, चंदननगर, येरवडासह साधारणत: ५८ चौरस किलो मिटरच्या परिसरातील नागरिकांना या प्रकल्पामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

Bhama Askhed's 'Dream Project' in the eastern part of Pune city is ready for water supply | पुणे शहराच्या पूर्व भागातील भामा आसखेडचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ पाणीपुरवठ्यासाठी सज्ज

पुणे शहराच्या पूर्व भागातील भामा आसखेडचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ पाणीपुरवठ्यासाठी सज्ज

Next
ठळक मुद्देनववर्षात पाणी घराघरात पोहचणार       स्थापत्य विषयक कामांचा उत्कृष्ट नमुना

पुणे : संरक्षण, वन, जलसंपदासह विविध २२ खात्यांच्या परवनाग्या, आंदोलनांचा मागे लागलेला ससेमिरा व सात वर्षांचा कालावधी असे नानाविध अडथळे पार करत आजमितीला पुणे महापालिकेचा ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्प’ पूर्णपणे प्रत्यक्षात साकार झाला आहे. तब्बल सात वर्षांच्या खडतर प्रयत्नानंतर या प्रकल्पातील पाणीपुरवठ्याची चाचणी सध्या सुरू असून, धरणातून पंपिग केलेले पाणी शहराच्या पूर्व भागातील नळांना येत्या नववर्षात म्हणजे जानेवारी २०२१ च्या पहिल्याच आठवड्यात पाणी पोहचणार आहे. 

पुणे शहराचा पूर्व भाग म्हणजे लोहगाव, कळस, धानोरी, वडगावशेरी, खराडी, चंदननगर, येरवडासह साधारणत: ५८ चौरस किलो मिटरच्या परिसरातील नागरिकांना या प्रकल्पामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. खडकवासला धरणातून यापूर्वी होणारा पाणीपुरवठा चार ठिकाणी पंपिग होऊन या भागात पोहचत असल्याने, वीज पुरवठा खंडित झाल्यावर बंद होणारा पाणीपुरवठा, पाईपलाईनच्या समस्या, वाढती लोकसंख्या व पाण्याची कमतरता यामुळे शहराचा पूर्व भाग सतत पाणी समस्येने ग्रासला होता. 


  वर्षोनुवर्षे महापालिकेचे मुबलक पाणी नसल्याने टँकरची वाट पाहणाऱ्या येथील नागरिकांना आता नवीन वर्षात चोवीस तास पाणीपुरवठा तेही एकाच ठिकाणी पंपिग व उर्वरित सर्व वहन हे ‘ग्रॅव्हिटीने’(विना पंपिंग करता नैसर्गिक उतारामुळे) प्राप्त होणार आहे. ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्प’ पूर्ण झाल्याने शहराच्या पूर्व भागाला आपले हक्काचे ‘२०० एम़एल़डी़’ पाणी उपलब्ध होत आहे. 
 

प्रकल्प साकारताना स्थानिक शेतकऱ्यांचा विरोधासह नानाविध कारणांमुळे हा प्रकल्प रेंगाळला. पण या अडचणी येत असतानाही, उर्वरित भागातील काम कसे पूर्ण होईल याकरिता महापालिकेच्या अभियंत्यांनी चंग बांधला़ त्याचे फलित म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागताच अवघ्या काही दिवसात आसखेड गावातील तसेच केळगावमधील पाईप लाईनचे काम हातोहात पूर्ण झाले. महापालिकेतील शहर अभियंता प्रशांत वाघमारे, युवराज देशमुख, सुदेश कडू यांसह साधारणत १० अभियंते व ४०० जणांची टीम या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी सात वर्षे अहोरात्र कार्यरत राहिली. या काळात महापालिकेसह राज्यातही सत्तांतर झाले व सर्वांनीच हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी प्रशासनास पाठबळ दिले. त्यामुळे अनेक वर्षांपासून पुरेशा पाण्याअभावी हालअपेष्टा सहन कराव्या लागणाऱ्या शहरातील पूर्व भागातील नागरिकांची तहान हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्याने भागणार आहे.
--------------------

‘ड्रीम प्रोजक्ट’ पाणीपुरवठ्यासाठी सज्ज

‘लेक टॅपिंग’ हा शब्द आपण आजपर्यंत कोयना धरणाशी निगडित बातम्यांमध्ये वाचला. पण असेच लहान प्रमाणात का होईना ‘लेक टॅपिंग’ भामा आसखेड धरणामध्ये या पाणीपुरवठ्याच्या प्रकल्पासाठी पुणे महापालिकेकडूनही करण्यात आले आहे. पाईपलाईनमधून कायम पाणीपुरवठा होईल याकरिता जॅकवेल च्या ठिकाणी तब्बल ३० मीटर खोल जाऊन बोगदा घेणे व सहा मिटरचा तळाचा खडक फोडून पाणी प्रकल्पात आणणे हे दिव्य महापालिकेच्या अभियंत्यांनी करून दाखविले आहे. 


           जॅकवेलच्याखाली ३० मीटर खोल, पाण्याखालील बोगदा, साडेआठ किलो मीटर अंतरावर एकाच ठिकाणी पंपिंगचा वापर करून पुढे साधारणत: ३४ किलो मिटर अंतरातून ग्रॅविटीव्दारे पाणी पोहचविणे व एक छोटीशी चारचाकीही जाईल एवढ्या व्यासाची पाईप लाईन टाकणे़ अशी शेकडो कामे ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पात’साकारून एक स्थापत्य विषयक कामांचा उत्कृष्ठ नमुना पुणे महापालिकेने दाखवून दिला आहे.

Web Title: Bhama Askhed's 'Dream Project' in the eastern part of Pune city is ready for water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.