भांडारकर संस्थेची छोट्या मुलांसाठी पंचतंत्रातल्या गोष्टींवर प्रश्नमंजुषा स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:14 AM2020-12-30T04:14:01+5:302020-12-30T04:14:01+5:30
पुणे: भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतर्फे लहान मुलांसाठी प्रथमच पंचतंत्रातल्या गोष्टींवर आधारित ऑनलाइन प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ...
पुणे: भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतर्फे
लहान मुलांसाठी प्रथमच पंचतंत्रातल्या गोष्टींवर आधारित ऑनलाइन प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा वयोगट ७ ते १० आणि ११ ते १४ अशा दोन गटात होणार आहे. स्पर्धेमध्ये आजमितीला १७०० हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला आहे. स्पर्धेची नोंदणी बंद झाली असून, स्पर्धेच्या पुढच्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. संपूर्णपणे इंग्रजी भाषेतून ही स्पर्धा होणार असून, पंचतंत्रातल्या गोष्टींमधून कोणत्याही पाच गोष्टी निवडून त्याचे पाठांतर करुन ते ऑडिओ स्वरुपात आणि म्हणतांनाचा व्हिडिओ काढून तोे वाढीव कालावधीनुसार दि. ४ जानेवारी पर्यंत ऑनलाइन पध्दतीने संस्थेकडे पाठवायाचा आहे. त्यानंतर दुस-या फेरीत बहुपर्यायी प्रश्नावली देखील असणार आहे. त्यानंतर परीक्षण व निकाल जाहीर केले जातील. दोन्ही गटात प्रथम तीन याप्रमाणे रोख बक्षिसे असून, प्रत्येक स्पर्धक मुलाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या स्पर्धेला कोणतेही शुल्क नाही.
याविषयी अधिक माहिती देताना संस्थेचे मानद सचिव व या उपक्रमाचे रचनाकार प्रा. सुधीर वैशंपायन म्हणाले की, मुलांसाठी काही उपक्रम संस्थेने राबवावेत यासाठी अमेरिकेतील नागरिकांकडून काही अल्पशी रक्कम मिळाली आहे. त्याचा विचार करुन पंचतंत्रातील व्यवहार, राजनीती व चातुर्याच्या विचारप्रवर्तक गोष्टी मुलांना वाचायला मिळाव्यात आणि त्यातून प्रश्नमंजूषा घेण्याचे ठरवले. यास खूपच मोठा प्रतिसाद मिळाला आहे. याबाबत ओम पब्लिकेशन्सच्या ''''''''३६५ पंचतंत्र स्टोरीज'''''''' या इंग्रजी पुस्तकातील कथांचा उपयोग मुलांनी करण्यास या प्रकाशन संस्थेने परवानगी दिली आहे.
---------------------------------------