भांडारकर संस्थेची ई-लायब्ररी होणार खुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 02:55 AM2018-12-16T02:55:42+5:302018-12-16T02:56:03+5:30

मूर्त स्वरूप प्राप्त : वाचकांना फायदा

Bhandarkar's e-library will open | भांडारकर संस्थेची ई-लायब्ररी होणार खुली

भांडारकर संस्थेची ई-लायब्ररी होणार खुली

googlenewsNext

पुणे : शताब्दी वर्षाच्या निमित्ताने भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘ई-लायब्ररी’ प्रकल्पाला आता मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. नियमित वापरामुळे जीर्ण व दुर्मिळ अशी एक हजार पुस्तके संस्थेच्या संकेतस्थळावरील ‘ई-लायब्ररी’मध्ये उपलब्ध करून दिली आहेत. मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते बुधवारी (दि. १९) संस्थेच्या ई-लायब्ररीचे उद्घाटन होणार आहे. ‘वेरूळ-एक अद्भूत शिल्प’ या विषयावर देगलूरकर यांचे व्याख्यान होणार आहे.

विविध विषयातील ज्ञानशाखांचा अभ्यास आणि संशोधन करणाऱ्या जगभरातील वाचकांना पुस्तके वाचता येणार आहेत, अशी माहिती संस्थेचे मानद सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. भांडारकर संस्था व डायमंड पब्लिकेशन्सतर्फे भरविण्यात येणाºया पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांच्या हस्ते बुधवारी सकाळी दहा वाजता होणार असून, महापौर मुक्ता टिळक उपस्थित राहणार आहेत. संस्थेच्या टाटा सभागृहामध्ये २६ डिसेंबरपर्यंत दररोज सकाळी दहा ते रात्री आठ या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे, असे भूपाल पटवर्धन आणि दत्तात्रय पाष्टे यांनी सांगितले.

पाच हजार पुस्तके
‘मुलाखतकाराची मुलाखत’ या कार्यक्रमात सुधीर गाडगीळ यांची २१ डिसेंबर रोजी मुलाखत होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल २६ डिसेंबर रोजी डॉ. अरुणा ढेरे यांचा संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अभय फिरोदिया यांच्या हस्ते ढेरे यांचा सत्कार करणार असून, ढेरे यांचे व्याख्यान होईल. विविध विषयावरील ५ हजार पुस्तके उपलब्ध होणार आहे.

Web Title: Bhandarkar's e-library will open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.