म्युकरमायकोसिस आजारांवरील औषधांचा काळा बाजार रोखण्यासाठी भरारी पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:11 AM2021-05-20T04:11:40+5:302021-05-20T04:11:40+5:30

पुणे : कोरोना विषाणूच्या अनुषंगाने म्युकरमायकोसिस आजारांवरील औषधांचा पुरवठा आणि वितरण सुरळीतपणे करण्यासाठी तसेच काळा बाजार रोखण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड ...

Bharari squads to curb the black market of drugs for myocardial infarction | म्युकरमायकोसिस आजारांवरील औषधांचा काळा बाजार रोखण्यासाठी भरारी पथके

म्युकरमायकोसिस आजारांवरील औषधांचा काळा बाजार रोखण्यासाठी भरारी पथके

googlenewsNext

पुणे : कोरोना विषाणूच्या अनुषंगाने म्युकरमायकोसिस आजारांवरील औषधांचा पुरवठा आणि वितरण सुरळीतपणे करण्यासाठी तसेच काळा बाजार रोखण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात १९ भरारी पथके नेमण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख दिली.

अन्न आणि औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त शाम प्रतापवर यांच्याकडे या १९ भरारी पथकाचे नियंत्रण देण्यात आले आहे. येणाऱ्या तक्रारीबाबत या पथकांनी प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित मेडिकल/रुग्णालयात जाऊन तपासणी करायची आहे. म्युकरमायकोसिस या आजारांवरील औषधांची योग्य किमतीत विक्री होतेय का नाही, याची पडताळणी करायची आहे. कोणी गैरप्रकार अथवा काळा बाजार करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करायची आहे. त्याचबरोबर रुग्णांना योग्य आणि वेळेत उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिल्या आहेत.

स्थानिक पातळीवर कारवाईच्या अनुषंगाने काही अडचण आल्यास भरारी पथकाला स्थानिक पोलीस प्रशासन मनुष्यबळ पुरवणार आहे. यासाठी प्रत्येक गावातील तलाठी यांच्याकडेही जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच कार्यक्षेत्र निश्चित करण्यात आले आहे.

Web Title: Bharari squads to curb the black market of drugs for myocardial infarction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.