Swapnil Kusale: भारत माता की जय; ढोल ताशांचा गजर, स्वप्नील कुसाळेची बालेवाडीत जंगी मिरवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 02:05 PM2024-08-08T14:05:52+5:302024-08-08T14:06:38+5:30
ऑलिम्पिकमधील ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात पदक जिंकून स्वप्नीलने मोठा इतिहास रचला
पुणे: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोल्हापुरच्या स्वप्नील कुसाळे (swapnil kusale) याने इतिहास रचला आहे. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत स्वप्नीलने कास्यपदक जिंकले. ऑलिम्पिकमधील ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात पहिल्यांदाच पदक जिंकले आहे. चालू ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे तिसरे पदक आहे. या पदकावर नाव कोरुन स्वप्नीलने मोठा इतिहास रचला आहे. त्यानंतर संपूर्ण भारतातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षांव होऊ लागला आहे. तो आजच महाराष्ट्रात परतला असून पुण्यात आज सकाळी दाखल झाला आहे.
पुण्याच्या बालेवाडी स्टेडियम मध्ये त्याने नेमबाजीचा सराव केला होता. म्हणूनच स्टेडियमला भेट देण्यासाठी तो आज दुपारी बालेवाडीला आला. याठिकाणी ढोल ताशांच्या गजरात आणि भारत माता कि जय या जयघोषात त्याची ऑर्किड हॉटेल ते शुटींग रेज जंगी मिरवणूक काढण्यात आली. तसेच या उत्तुंग कामगिरीला सलाम करण्यासाठी एका विशेष सत्कार करण्यात आला.
#WATCH | Maharashtra: Olympic medalist Swapnil Kusale holds victory roadshow in Pune
— ANI (@ANI) August 8, 2024
He won Bronze medal in Men's 50m Rifle in the #ParisOlympics2024. pic.twitter.com/t82ATeakNW
महाराष्ट्राला वैयक्तिक पदक १९५२ मध्ये खाशाबा जाधव यांच्या रुपाने मिळाले होते. खाशाबा जाधवही कोल्हापुरचे होते, आता १९५२ नंतर पुन्हा एकदा वैयक्तिक पदक मिळवणारा खेळाडू कोल्हापुरचाच आहे. स्वप्नील कुसाळेने जोरदार खेळी केली होती. अंतिम फेरीतही चमकदार कामगिरी करत अखेर कोल्हापुरकरांचं स्वप्न साकार केलं.
अशी केली खेळी
अंतिम फेरीत मातब्बर खेळाडू मैदानात होते. फायनलमध्ये सुरुवातीला स्वप्नील सहाव्या स्थानी होता. (swapnil kusale kolhapur) अंतिम फेरीत एकूण आठ स्पर्धक होते. (swapnil kusale shooting) प्रत्येक नेमबाजाला ४० शॉट्सची संधी होती. हे शॉट्स पूर्ण झाल्यानंतर सर्वात कमी गुण असलेले दोन खेळाडू स्पर्धेबाहेर झाले. नंतर प्रत्येक एका शॉटनंतर सुवर्ण आणि रौप्य पदक निश्चित होईपर्यंत प्रत्येक १-१ खेळाडू बाहेर होत गेला.Kneeling ची अर्थात पहिली फेरी पूर्ण होईपर्यंत स्वप्नील पाचव्या स्थानावर होता. आता स्टँडिंग शॉट्स पदकांचे चित्र स्पष्ट करणारे होते. यात स्वप्नीलने चमकदार कामगिरी करत तिसऱ्या स्थानापर्यंत मजल मारली. या राऊंडच्या अखेरपर्यंत यूक्रेनचा खेळाडू अव्वल तर चीनचा दुसऱ्या आणि भारताचा स्वप्नील तिसऱ्या स्थानावर राहिला. या घडीला पाच स्पर्धक स्पर्धेत जिवंत होते. पण यातील एक खेळाडू स्पर्धेबाहेर झाल्याने स्वप्नीलचे पदक पक्के झाले.