भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:10 AM2021-04-15T04:10:50+5:302021-04-15T04:10:50+5:30
पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुणे शहर आणि उपनगरात विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले होते. राजकीय ...
पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुणे शहर आणि उपनगरात विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले होते. राजकीय पक्ष, विविध संस्था, संघटना आणि नागरिकांनी पुणे स्टेशन येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला भेट देऊन अभिवादन केले.
स्थानिक नगरसेविका आणि मनपा विधीसमिती अध्यक्षा मनिषा लडकत यांच्या हस्ते पुणे स्टेशन येथील पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी संदीप लडकत, नंदू काळोखे, जगदीश वणियार, नंदू बनकर, बाळासाहेब तोडकर उपस्थित होते.
दि डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया :
नाना पेठ येथील अहिल्याश्रम मधील संस्थेच्या आवारात बाबासाहेबांच्या प्रतिमेस जनरल सेक्रेटरी एम. डी. शेवाळे आणि अध्यक्ष डी. पी. रजपूत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विशाल शेवाळे, अशोक कासुळे, राहुल ननावरे, रवी धेडे, अनिल चव्हाण, रघुपती खेत्रे, सचिन भालेराव उपस्थित होते.
अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस :
राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. सुधाकर पणीकर यांच्या हस्ते पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. गौतम बंगाळे, ॲड. सुशील मंचरकर, शोभना पणीकर, दौलतराव धेंडे, दारथ चौकुले, प्रा. प्रकाश अंकुश, पी. के. गायकवाड, गुलाब चव्हाण, सचिन आहेर, दीपक निनारिया, रेखा राजे उपस्थित होते.
दलित पँथर ऑफ इंडिया :
संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब भोसले यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी इलियास शेख, द्रौपदी पाटील, गंगाताई सेन, महादेव गायकवाड, विजय भालेराव, संगराज गायकवाड, राहुल भोसले, रफीक इनामदार, पिंकू झेंडे, महेबूब मणियार, जावेश शेख उपस्थित होते.
भाजप झाेपडपट्टी आघाडी/एकता प्रतिष्ठान :
अध्यक्ष गणेश शेरला यांच्या हस्ते पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी जीवन माने, किरण वैष्णव, नजीर शेख, जयंत पानसकर, तुकाराम खंडागळे, अनिल निळुलकर उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी :
पक्षाचे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा अध्यक्ष आनंद सवाणे यांच्या हस्ते पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी ॲड. स्वप्निल गांगुर्डे, विशाल मोरे, सागर शेंडगे, महेंद्र कांबळे, ऋतिक सवाणे, बाबासाहेब पासोडे, आकाश वाघ, शुभम माने उपस्थित होते.
नॅशनलिस्ट कंझ्युमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन :
महानगर अध्यक्ष इंद्रजित सकट यांच्या हस्ते पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना लाडू वाटप करण्यात आले. यावेळी राजेश लोंढे, विनोद लोखंडे, आशिष म्हस्के, सुरेश यादव, विकी पवळे, सतिश कांबळे, किरण जगताप उपस्थित होते.
विलास चौरे समाजसेवा प्रतिष्ठान :
संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब चौरे यांच्या हस्ते पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी हर्षदा चौरे, अर्चना कांबळे, पंचशील चौरे, मुकुंद कांबळे, प्रमोद शेलार, शैलेश शिंदे, शिवदास माळगे, अविनाश रणसिंग उपस्थित होते.
पुणे शहर-जिल्हा मातंग समाज :
सचिव राहुल खुडे यांच्या हस्ते पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष गोवर्धन खुडे, चेतन बदोले, किरण कदम, विजय कणसे, नीलेश नडगिरी, रंगनाथ चलवादी, विग्नेश वामने, दिनेश पवार उपस्थित होते.
रिपब्लिकन जनशक्ती :
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र मोरे यांच्या हस्ते पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी अशोक माने, सचिन सुसगोहर उपस्थित होते.
ड्रीम लाईट फाऊंडेशन :
वडगावशेरी परिसरात फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेचे पुस्तकं वाटून जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्ष वाल्मीक सरतापे यांच्या हस्ते पुस्तके वाटप करण्यात आली. यावेळी रूपेश शेळके, विजय गायकवाड, सुहास पवारी, पाेपट ननावरे उपिस्थत होते.
ससून क्वॉर्टर्स राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट :
दलित मित्र मोतीलाल निनारिया व रवींद्र सरोदे यांच्या हस्ते पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी स्वीकृत नगरसेवक विनोद निनारिया, दीपक निनारिया, प्रमोद निनारिया, फादर राजू बारसे, राज सोलंकी, गोपी साेलंकी, प्रणव निनारिया, परेश चव्हाण, रूबेन डेव्हिड, उल्हास कांबळे उपस्थित होते.
राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) :
संघटनेचे कायदेशीर सल्लागार ॲड. फय्याज शेख यांच्या हस्ते कॅम्प येथील पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी मनोहर गाडेकर, अनिल औटी, ॲड. विद्या पेळपकर, ॲड. अनुपमा जोशी, सचिन कदम, प्रतिभा शिंदे उपस्थित होते.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी :
पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष शिलार रतनगिरी यांच्या हस्ते पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी विशाल वाघेला, विजय कांबळे, रवींद्र ओव्हाळ, हरीश खिलारे, बाळासाहेब कांबळे, ॲड. अक्षय रतनगिरी उपस्थित होते.