भरत शहा यांचा विविध पदांचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:11 AM2021-05-01T04:11:09+5:302021-05-01T04:11:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इंदापूर : इंदापूरच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपले मजबूत स्थान असणारे इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष, कर्मयोगी ...

Bharat Shah resigns from various posts | भरत शहा यांचा विविध पदांचा राजीनामा

भरत शहा यांचा विविध पदांचा राजीनामा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

इंदापूर : इंदापूरच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपले मजबूत स्थान असणारे इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक, नगरसेवक, इंदापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांनी घरगुती कारण सांगत गुरुवारी (दि. २९) त्यांच्याकडील विविध पदांचा राजीनामा दिला. भरत शहा यांच्या राजीनाम्यामुळे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीला तसेच सहकार क्षेत्र व त्यांच्या हजारो समर्थकांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

भरत शहा हे हर्षवर्धन पाटलांचे एक विश्वासू व निकटवर्ती मानले जातात. हर्षवर्धन पाटील यांच्याकडून भरत शहा यांच्या राजीनाम्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मी माझ्या घरगुती अडचणीमुळे थांबण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजीनामा दिला आहे. नवीन माणसांना सर्व क्षेत्रांत संधी मिळावी असे मला वाटते, अशी प्रतिक्रिया भरत शहा यांनी दिली.

माजी खासदार दिवंगत कर्मयोगी शंकरराव पाटील यांचे अत्यंत निकटचे सहकारी व त्यांच्या राजकीय सामाजिक कारकिर्दीचे साक्षीदार कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, उपाध्यक्ष गोकुळदास (भाई) शहा यांचे भरत शहा हे पुतणे आहेत. सलग पंधरा वर्षे ते इंदापूर अर्बन बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत.

भरत शहा हे गेल्या दहा वर्षांपासून कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर ते कार्यरत आहेत. सन २०१२ २०१७ या कालावधीत ते इंदापूर उपनगराध्यक्ष होते. सन २०१७ पासून आजतागायत ते नगरसेवक म्हणून काम पाहात आहेत. इंदापूरच्या नगराध्यक्षा अंकिता शहा यांचे ते दीर तसेच इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांचे ते बंधू आहेत. शंकरराव बाजीराव पाटील यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू असणारे गोकुळदास शहा यांचे पाटील कुटुंबासोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या राजकारणाच्या जडणघडणीमध्ये शहा कुटुंबाचा मोठा वाटा आहे. इंदापूर नगरपरिषद या पंचवार्षिकमध्ये खेचून आणण्यात भरत शहा यांचा मोलाचा वाटा होता. नगराध्यक्षपदी अंकिता मुकुंद शहा ह्या निवडून आल्यामुळे इंदापूर नगरपरिषदेवर हर्षवर्धन पाटील यांच्या विचाराची सत्ता तिसऱ्यांदा कायम राहिली.

फोटो ओळ : भरत शहा

Web Title: Bharat Shah resigns from various posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.