न्हावी १५ च्या सरपंचपदी भरत सोनवणे व उपसरपंचपदी सीमा जगताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:12 AM2021-02-11T04:12:43+5:302021-02-11T04:12:43+5:30
न्हावी १५ या गावाची ग्रामपंचायत सात सदस्यीय आहे. या वेळी ग्रामपंचायत सदस्य शिल्पा राहुल सोनवणे, संगीता सुनील शिंदे, सुधाकर ...
न्हावी १५ या गावाची ग्रामपंचायत सात सदस्यीय आहे. या वेळी ग्रामपंचायत सदस्य शिल्पा राहुल सोनवणे, संगीता सुनील शिंदे, सुधाकर विष्णू सोनवणे, अरुणा संजय चव्हाण, भगवान पांडुरंग गायकवाड या निवडणूक प्रक्रियेच्या वेळी उपस्थित होते.
भरत बबनराव सोनवणे तर सीमा सुरेश जगताप यांनी अनुक्रमे सरपंच व उपसरपंच पदासाठी यांनी निवडणूक आधिकरी यांच्याकडे अर्ज सादर केले होते. यासाठी कोणत्याही सदस्याने अर्ज दाखल केले नसल्यामुळे सरपंचपदी भरत सोनवणे तर उपसरपंचपदी सीमा जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मनीषा भुतकर यांनी काम पाहिले तर यासाठी मदतनीस म्हणून ग्रामसेवक हनुमंत वाघ यांनी काम पाहिले. यावेळी नव निर्वाचित सरपंच भरत सोनवणे म्हणाले की,आगामी काळात गावातील विकासकामांना प्राधान्य देणार असून शासनाच्या नवनवीन योजना सर्व ग्रामस्थांपर्यंत पोहचवणार आहे.
यावेळी पीडीसीसी बँकेचे संचालक भालचंद्र जगताप, राजगडचे साखर कारखान्याचे माजी संचालक रविकांत सोनवणे, माजी सरपंच वसंतबापू सोनवणे, अजित शिंदे, माजी उपसरपंच सुर्यकांत जगताप व उदय कोंडे, रामदास सोनवणे, शिवाजी सोनवणे, सुधाकर सोनवणे, धनंजय जगताप, प्रकाश सोनवणे,महादेव जगताप, जयवंत सोनवणे आदी ग्रामस्थ होते.
--
फोटो : ०९नसरापूर न्हावी
सोबत ओळी : न्हावी १५ गावचे नव निर्वाचित सरपंच भरत सोनवणे व उपसरपंच सीमा जगताप यांचा सत्कार करताना पीडीसीसी बँकेचे संचालक भालचंद्र जगताप आणि मान्यवर