भारती विद्यापीठाचे जीवनसाधना गौरव पुरस्कार जाहीर

By admin | Published: April 24, 2017 03:30 PM2017-04-24T15:30:54+5:302017-04-24T15:30:54+5:30

भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या जीनवसाधना गौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे

Bharati University's Jeevasadhna Gaurav Puraskar | भारती विद्यापीठाचे जीवनसाधना गौरव पुरस्कार जाहीर

भारती विद्यापीठाचे जीवनसाधना गौरव पुरस्कार जाहीर

Next

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 24  - भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या जीनवसाधना गौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. आमदार गणपतराव देशमुख, ज्येष्ठ साहित्यीक प्रा. द. मा. मिरासदार, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विनोद शहा आणि माजी कुलगुरु डॉ. एस. एफ. पाटील यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
विश्वविद्यालयाचा २२ वा स्थापना दिन समारंभ दि. २६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता पुणे - सातारा रस्त्यावरील शैक्षणिक संकुलात होणार आहे. या कार्यक्रमामध्ये हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. रोख ५१००० रुपये, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. भारती विद्यापीठाचे संस्थापक-कुलपती डॉ. पतंगराव कदम हे अध्यक्षस्थानी असतील. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींना कृतज्ञतेच्या भावनेतून भारती विद्यापीठ विश्वविद्यालय जीवनसाधना गौरव पुरस्ककाराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते. या समारंभात गुणवत्तापूर्ण कामगिरीसाठी प्राध्यापकांचा आणि सेवकांचाही सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्रा.डॉ. शिवाजीराव कदम यांनी दिली.

Web Title: Bharati University's Jeevasadhna Gaurav Puraskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.