आंबेगावात चार प्राथमिक आरोग्य केंद्रांवर ‘भारत’ची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:14 AM2021-07-14T04:14:46+5:302021-07-14T04:14:46+5:30

नियंत्रणासाठी मदत करण्यात आली आहे. भारत फोर्ज लि. पुणे व महाराष्ट्र आरोग्य मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामविकास कार्यक्रमांतर्गत ...

Bharat's assistance to four primary health centers in Ambegaon | आंबेगावात चार प्राथमिक आरोग्य केंद्रांवर ‘भारत’ची मदत

आंबेगावात चार प्राथमिक आरोग्य केंद्रांवर ‘भारत’ची मदत

Next

नियंत्रणासाठी मदत करण्यात आली आहे.

भारत फोर्ज लि. पुणे व महाराष्ट्र आरोग्य मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामविकास कार्यक्रमांतर्गत कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्रांना उपयुक्त असे साहित्य वाटप केले.

त्यावेळी सीएसआर विभागप्रमुख लीना देशपांडे यांनी विचार व्यक्त करताना कोविड-१९ नियंत्रणात आणण्यासाठी 'एकत्रितपणे काम करू यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास भारत फोर्ज लि.तयार आहे. भारत फोर्जकडून दिल्या जाणाऱ्या मदतीचा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत वापर व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. महाराष्ट्र आरोग्य मंडळ डिंभा येथे साहित्य वाटपाचा कार्यक्रम झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती संजय गवारी हे होते. महाराष्ट्र आरोग्य मंडळ संस्थेचे संचालक अरुण गुजर, जि. प. सदस्या तुलसीताई भोर व रूपाली जगदाळे, तालुका आरोग्य अधिकारी सुरेश ढेकळे, माजी जिल्हा परिषद सदस्या जनाबाई उगले, भारत फोर्ज सीएसआर विभागाचे जयदीप लाड, महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे सागर मिटकरी, बाळासाहेब बेंढारी, माणिक सावंत, सोमा केंगले उपस्थित होते. प्रास्ताविक प्रकल्प समन्वयक सुरेश काळे यांनी व आभार प्रदर्शन किशोर भोर यांनी केले. सूत्रसंचालन उदयसिंह चौधरी यांनी केले.

Web Title: Bharat's assistance to four primary health centers in Ambegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.