भरून न येणा-या जखमतेून अजूनही सावरतंय माळीण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 03:35 AM2017-07-30T03:35:40+5:302017-07-30T03:35:40+5:30
एका दुर्दैवी पहाटे चक्क डोंगरच कोसळला आणि त्याखाली सारे गाव गाडले गेले. अनेक कुटुंबे बेघर झाली, उद्ध्वस्त झाली. त्या सा-या जखमांतून सावरत आता
- नीलेश काण्णव ।
घोडेगाव : एका दुर्दैवी पहाटे चक्क डोंगरच कोसळला आणि त्याखाली सारे गाव गाडले गेले. अनेक कुटुंबे बेघर झाली, उद्ध्वस्त झाली. त्या सा-या जखमांतून सावरत आता पुन्हा माळीण उभे राहिले आहे. त्याला उद्या ३० जुलैला बरोबर तीन वर्षे पूर्ण होत आहेत. नव्या ठिकाणी पुनर्वसन झालेले असले तरीही काळजावर कोरलेले व्रण आणि मनातल्या वेदना अजूनही पूर्णत: मिटलेल्या नाहीत, हे माळीणवासींयांना भेटल्यावर जाणवत राहते. या दुर्घटनेला उद्या ३० जुलै २०१७ रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहेत.
३० जुलै २०१४ ची सकाळ, रात्रभर पडलेल्या पावसामुळे साचलेले पाणी डोंगराला पडलेल्या भेगांमध्ये साठून डोंगराचा कडा कोसळला. प्रचंड आवाज आणि चिखलाचा मोठा लोंढा गावाच्या दिशेने वेगाने आला. डोंगरावरची झाडे भिंगरीसारखी उडत खाली आली. अचानक घडलेल्या या घटनेने कोणालाही सावरण्याची संधीही मिळाली नाही. काही सेकंदांत संपूर्ण गावच ढिगाºयाखाली गाडले गेले आणि या दुर्घटनेत १५१ लोक मृत्युमुखी पडले. दुर्घटनेतून वाचलेले माळीण ग्रामस्थ नवीन बांधण्यात आलेल्या गावठाणात राहत असले तरी येथे पहिल्याच पावसात भराव खचून झालेले नुकसान पाहून हे पुन्हा भयभीत झाले होते. माळीण दुर्घटनेत ४० कुटुंबातील १५१ लोक ढिगाºयाखाली सापडून मृत झाले. यातील ९ लोक जखमी अवस्थेत सापडले, तर ३८ लोक बाहेरगावी कामानिमित्त गेल्याने वाचले. शासकीय यंत्रणेने राष्टीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या माध्यमातून आठ दिवस ढिगाºयाचे खोदकाम केले व १५१ मृतदेह बाहेर काढले. शासनाकडून मृतांच्या वारसांना प्रत्येक व्यक्तीमागे ८.५० लाख रुपये देण्यात आले व विविध योजनांमधून मदत करण्यात आली. तसेच दुर्घटना घडल्याबरोबर दोन महिन्यांत माळीण फाट्यावर तात्पुरती शेड उभारून येथे तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले व कायमस्वरूपी पुनर्वसन एका वर्षात करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पुनर्वसनासाठी जागा मिळण्यास वेळ गेल्याने हे काम पूर्ण होण्यास अडीच वर्षे लागली. नवीन गावात ६८ घरे बांधण्यात आली असून सर्व बारा मूलभूत सेवासुविधा देण्यात आल्या आहेत. माळीण दुर्घटनेतून वाचलेल्या १६ अंशत: बाधित कुटुंबांचे प्रचंड हाल झाले. मात्र यांनाही नवीन गावठाणात घर मिळाले.
पहिल्याच पावसात
नव्या गावाची दैना
मात्र दि. २४ जून रोजी झालेल्या पहिल्याच पावसात या नवीन गावाची दैना उडाली. ठिकठिकाणी भराव खचल्याने भिंतींना तडे गेले, रस्ते खचले, रस्त्यांना तडे गेले, घरांच्या पायºया खचल्या, ड्रेनेजच्या पाइपलाइन उखडल्या, गटारे छोटी झाल्याने रस्त्यावरून पाणी वाहिले, तसेच अंगणवाडीजवळील मोठी भिंत तुटल्याने शाळेला धोका निर्माण झाला.
सात कुटुंबे पुन्हा पत्र्याच्या घरात
पहिल्या पावसात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली, भिंतींना तडे गेल्याने या मोठमोठ्या बांधलेल्या आरसीसी भिंती घरांवर पडल्या, तर पुन्हा गावावर मोठे संकट येऊ शकते किंवा भराव खचू लागल्याने घरेही खचतील, या भीतीने काही लोक पुन्हा पत्र्याच्या शेडमध्ये राहायला जाण्याची तयारी करू लागले. यातील सात कुटुंबे पत्र्याच्या शेडवर राहायलादेखील गेली आहेत.
उर्वरित कामे पावसाळ््यानंतरच
प्रशासनाने तत्काळ दखल घेत खचलेले भराव भरले, नवीन गटारे बांधली, रस्ते दुरुस्त करून घेतले, लाईटचे पोल उभे करून विद्युत पुरवठा सुरू करून दिला, पाइपलाइन दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरू केला. मात्र यातील अनेक कामे पावसाळा संपल्याशिवाय करता येणार नाहीत. यामध्ये पक्के रस्ते बांधणे, नवीन पायºया करणे, घरांपुढील खचलेल्या पायºया करणे ही कामे पावसाळा संपल्याबरोबर सुरू केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
नव्या माळीणपुढचे सवाल :
सपाटीकरण करण्यासाठी खालची जमीन मोठ्या प्रमाणात खोदली गेली व नवीन सुमारे ८ ते १० मीटर उंचीचे भराव केले गेले. हे भराव खचू शकतात, ही बाब प्रकल्प सल्लागारांच्या लक्षात का आली नाही?
थर्ड पार्टी इन्स्पेक्शनमध्ये
नक्की काय झाले?
मातीवरच पायºया बांधल्याने
त्या खचल्या. यात दोषी कोण?