पोलीस भरतीच्या नव्या निकषांच्या विराेधात भारिपची निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 04:41 PM2019-02-11T16:41:39+5:302019-02-11T16:43:01+5:30
पाेलीस भरतीमध्ये करण्यात आलेल्या बदलांच्या विराेधात भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर तीव्र निदर्शने करण्यात आली.
पुणे : पाेलीस भरतीमध्ये करण्यात आलेल्या बदलांच्या विराेधात भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर तीव्र निदर्शने करण्यात आली.
सरकारच्या नवीन जीआर नुसार आता पाेलीस शिपाई या पदासाठी 100 गुणांची लेखी चाचणी हाेणार आहे आणि केवळ 50 गुणांची शारिरीक चाचणी. या नवीन नियमानुसार गरजू विद्यार्थ्यांना तसेच बहुजन आणि ग्रामीण भागातील उमेदवारांना फटका बसणार आहे. बहुजन आणि ग्रामीण भागातील उमेदवारांना संधी मिळू नये यासाठी नवीन नियम शासनाने केल्याचा आराेप करत या निर्णयाचा निषेध भारिप व वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला. या वेळी पुणे शहर आणि ग्रामीण भागातून कार्यकर्ते आणी महिला या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ,या आंदोलनाचे नेतृत्त्व भारीपचे शहराध्यक्ष अतुल बहुले यांनी केले तसेच हा निर्णय रद्द न केल्यास पुणे शहरात हजारोंच्या संख्येचा मोर्चा काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.