भारती रुग्णालयाच्या डॉक्टरांवर हल्ला
By admin | Published: March 31, 2017 03:34 AM2017-03-31T03:34:14+5:302017-03-31T03:34:14+5:30
उपचारादरम्यान रुग्ण दगावल्यानंतर नातेवाइकांनी गोंधळ घालीत डॉक्टरांना शिवीगाळ केल्याची घटना कात्रज येथील
पुणे : उपचारादरम्यान रुग्ण दगावल्यानंतर नातेवाइकांनी गोंधळ घालीत डॉक्टरांना शिवीगाळ केल्याची घटना कात्रज येथील
भारती रुग्णालयामध्ये गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली. या नातेवाइकांनी डॉक्टरांना खुर्च्या फेकून मारण्याचाही
प्रयत्न केला. रुग्णालयाकडून माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस रुग्णालयात धावले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. यामुळे डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी पांडुरंग लक्ष्मण खळदकर व राहुल लक्ष्मण खळदकर (रा. सर्व्हे. १६, आंबेगाव पठार) यांना अटक केली आहे. प्रवीण रघुनाथ जाधव (वय ४१, रा. दामोदर रेसिडेन्सी, आंबेगाव पठार, धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोटदुखी आणि घाम येत असल्यामुळे मंदा लक्ष्मण खळदकर (वय ५८)
यांना मंगळवारी रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात
आले होते.
बुधवारी पहाटे त्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. फिर्यादी जाधव हे भारती रुग्णालयात कार्यालय पर्यवेक्षक म्हणून काम करतात. मंदा यांचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाइकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.
(प्रतिनिधी)
खुर्च्या फेकून मारण्याचा प्रयत्न
डॉक्टरांनी चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे तसेच योग्य उपचार न केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप
नातेवाइकांनी केला. रुग्णालयाचे डॉ. श्रीराज पवार यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली.
दुसरे डॉ. सुमीत जगताप हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये व्हिडीओ शूटिंग करीत होते. आपले शूटिंग केले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी अधिकच आक्रमक होत खुर्च्या फेकून मारण्याचा प्रयत्न केला. तसेच जगताप यांच्या पाठीवर हाताने मारण्यात आले.