जिल्ह्यातील १५ हिंदी विषय शिक्षकांना ‘भाषारत्न’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:10 AM2021-02-25T04:10:41+5:302021-02-25T04:10:41+5:30

गोवा येथील राज्यस्तरीय हिंदी संमेलनामध्ये जिल्ह्यातील १५ हिंदी विषय शिक्षकांना ‘भाषारत्न’ पुरस्काराने सन्मानित केले गेले असल्याची माहिती ...

'Bhasharatna' award to 15 Hindi subject teachers in the district | जिल्ह्यातील १५ हिंदी विषय शिक्षकांना ‘भाषारत्न’ पुरस्कार

जिल्ह्यातील १५ हिंदी विषय शिक्षकांना ‘भाषारत्न’ पुरस्कार

Next

गोवा येथील राज्यस्तरीय हिंदी संमेलनामध्ये जिल्ह्यातील १५ हिंदी विषय शिक्षकांना ‘भाषारत्न’ पुरस्काराने सन्मानित केले गेले असल्याची माहिती संमेलनाचे राज्य सहसमन्वयक उस्मान मुलाणी यांनी दिली.

गोवा येथे गोवा हिंदी अकादमी पुरस्कृत राज्यस्तरीय हिंदी प्रचार व प्रसार संमेलनाचे आयोजन दि. १९, २० व २१ फेब्रुवारी २०२१ रोजी पणजी मीरामार येथील हाॅटेल सोलमार सभागृहात झाला. त्यावेळी नवमहाराष्ट्र विद्यालय खराबवाडी (चाकण) या प्रशालेतील हिंदी विषय शिक्षक अशोक ठाणगे व अशोक शिंदे यांना ‘भाषारत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

ज्येष्ठ संपादक प्रभाकर ढगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनाचे उद्घाटन गोव्याचे कला, सांस्कृतिक आणि सहकार व आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते केले गेले.

या शानदार सोहळ्यासाठी देशाचे पूर्व केंद्रीय कायदामंत्री व गोव्याचे उपमुख्यमंत्री वकील रमाकांत खलफ, गोव्याचे पूर्व मुख्यमंत्री रवी नाईक, गोव्याचे पूर्व क्रीडा व कृषिमंत्री रमेश तवडकर, गोव्याचे शिक्षण संचालक भगिरथ शेट्ये हे उपस्थित होते . तर गोवा हिंदी अकादमी गोवाचे अध्यक्ष सुनील शेट हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते.

खराबवाडी (ता. खेड) या प्रशालेतील हिंदी विषय शिक्षक अशोक ठाणगे व अशोक शिंदे यांना ‘भाषारत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

Web Title: 'Bhasharatna' award to 15 Hindi subject teachers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.