भाटघर धरणातून पुन्हा विसर्ग

By admin | Published: December 21, 2015 12:42 AM2015-12-21T00:42:35+5:302015-12-21T00:42:35+5:30

भाटघर धरणाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलेल्या निर्णयाला बगल देत मोठ्या प्रमाणावर धरणातून पाण्याचा विर्सग सुरू आहे

Bhattghar dam again | भाटघर धरणातून पुन्हा विसर्ग

भाटघर धरणातून पुन्हा विसर्ग

Next

भोर : भाटघर धरणाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलेल्या निर्णयाला बगल देत मोठ्या प्रमाणावर धरणातून पाण्याचा विर्सग सुरू आहे. यामुळे धरणातील पाण्याची पातळी कमी होऊन भविष्यात धरण भागातील गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार आहे. त्यामुळे वीजनिर्मितीसाठी आवश्यक एवढेच पाणी सोडले जावे.
तसेच बेकायदेशिररीत्या सुरू असलेला पाण्याचा विर्सग थांबवावा अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा भाटघर धरण भागातील नागरिकांनी पाटबंधारे विभागाला दिला आहे.
भाटघर धरण भागातील संगमनेर, माळवाडी, ब्राह्मणघर, गोरड, म्हशीवली, हर्णस, मळे, करंदी बुद्रुक, डेरे, सांगवी हि. मा., म्हाळवडी या गावांतील ७४४ नागरिकांनी या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. भाटघर धरणात गेल्या वर्षी धरणात या महिन्यात ३० टक्के कमी पाणीसाठा होता. मागील २२ दिवसांपासून धरणातून २ हजार ५९९ क्युसेक्सने नीरा नदीत पाणी सोडल्याने धरणात ५४ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रात बिघाड झाल्याने धरणाच्या इरिगेशन गेटमधील चार मोऱ्यांतून पाणी सोडण्यात आले होते. मात्र हे पाणी बंद करून माळवाडी गावाकडील बाजूच्या मोऱ्यांतून पाणी सोडले आहे.
जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार संग्राम थोपटे, जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे. (वार्ताहर)

Web Title: Bhattghar dam again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.